वेल्हे,(पुणे ) : तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालावधीपासून सुरू असलेल्या परंपरेनुसार ऐतिहासिक अशा किल्ले तोरणा राजगडसह तीर्थक्षेत्र वांगणी , वेल्हे व शिरकोलीसह तालुक्यातील विविध ठिकाणी घटस्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली.
आजपासून सुरू झालेल्या शारदीय नवरात्र उत्सवासाठी किल्ले तोरणागडावर स्थानिक युवकांसह नागरिकांनी मोठी गर्दी करत भक्ती भावाने किल्ल्यावरील श्री मेंगाईदेवी, तोरणजाईदेवी व वाळणजाई देवी परिसरातील कुंबळजाई देवी व वरदानी देवी या ठिकाणी घटस्थापना करण्यात आली. यावेळी गोरक्ष भुरुक, मंगेश पवार, सुनील राजीवडे, लक्ष्मण पवार ,गणेश निकम, नारायण पवार ,संजय गुजर, आदेश वेगरे,रुपेश राजीवडे आदींसह तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किल्ले राजगडावर सुद्धा मोठ्या उत्साहात पद्मावती देवी मंदिरात तसेच सुवेळा माचीवरील काळेश्वरी मंदिरात घटस्थापना करण्यात आली याप्रसंगी पुरातत्व विभागाचे कर्मचारी बापू साबळे, विशाल पिलावरे आदींसह नागरिक उपस्थित होते.
किल्ले तोरणागडाच्या पायथ्याशी असलेल्या वेल्हे बुद्रुक गावामध्ये मेंगाई देवीच्या मंदिरात मोठ्या उत्साहात घटस्थापना करण्यात आली.या देवीसाठी शिवकालीन असलेले दागिने तहसील कार्यालयातील कोषागार मधून घेण्यात आले आहेत.
आज वेल्ह्याचे तहसीलदार दिनेश पारगे, महसूल नायब तहसीलदार गौरी तेलंग, तसेच निवासी नायब तहसीलदार राजश्री भोसले यांच्या हस्ते पूजा करण्यात आली याप्रसंगी प्रकाश पवार, संतोष मोरे, विकास गायखे, जालिंदर भूरुक आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर 'क' तीर्थक्षेत्र दर्जा असलेले ऐतिहासिक वांगणी येथील मळाई देवी मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात घटस्थापना करण्यात आली. याप्रसंगी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त दिगंबर चोरघे, बाळासाहेब चोरघे, आकाश वाडघरे,उपसरपंच शिवाजी चोरघे,भागोजी चोरघे, विजय चोरघे, कैलास चोरघे, विश्वनाथ चोरघे, अंकुश चोरघे, तानाजी चोरघे,
भरत चोरघे, पुजारी नंदू गुरव आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर शिरकोली येथील शिरकाई देवी मंदिरात घटस्थापना उत्साहात झाली या ठिकाणी सचिव अमोल पडवळ यांच्यासह विश्वस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान तालुक्यातील दापोडी येथील वाघजाई मंदिरात ,आंबवणे येथील जानुबाई मंदिरात ,वाघजाई मंदिरात, सोंडे परिसर ,अठरागाव मावळ, बारागाव मावळ, गुंजन मावळ परिसरात मोठ्या उत्साहात घटस्थापना करण्यात आली तालुक्यातील विविध ठिकाणी विविध संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.