पुणे : छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचा इतिहास हा आपण महाराष्ट्र, देशापुरता संकुचित ठेवणार आहोत का? हा इतिहास आंतरराष्ट्रीय स्तरावर कसा न्यायचा, याचा विचार आता करावा लागणार आहे. हा इतिहास पुढे गेला नाही, तर ही ऐतिहासिक चूक ठरेल, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी केले.
डॉ. केदार फाळके लिखित 'छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती' या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे, इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, डॉ. फाळके, भांडारकर संंस्थेचे विश्वस्त प्रदीप रावत, भूपाल पटवर्धन, सुधीर वैशंपायन यावेळी उपस्थित होते.
रामराजे म्हणाले, "व्हिएतनामाचे लोक रायगडावर येतात आणि तेथील माती घेऊन जातात, यातून आपला इतिहास काय, हे समजून घेतले पाहिजे. म्हणूनच कर्तव्य म्हणून आपला इतिहास आपण पुढे नेला पाहिजे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपले कर्तव्य बजावले पाहिजे, तरच योग्य इतिहास पुढच्या पिढीपर्यंत जाईल." मी तीन दशके राजकारण केले, पण राजगडच्या पायथ्याशी असणारी सईबाईंची समाधीचे पुनर्निमाण करू शकलो नाही, खंत त्यांनी व्यक्त केली.
डॉ. मोरे म्हणाले, "मराठ्यांच्या इतिहासाची पुनर्मांडणी आम्ही करीत आहोत. एनसीईआरटीच्या पुस्तकांमध्ये मराठ्यांचा इतिहास येत नव्हता, त्यासाठी चळवळ चालविली. मराठ्यांची राजनीती आता दुर्लक्ष गेले जात आहे. त्याला छेद देण्यासाठी संशोधन आणि तपशीलवार मांडणीची गरज आहे. मराठ्यांचा इतिहास जागतिक करायचा असेल, त्याच परिभाषेत त्याची मांडणी करावी लागेल."
बलकवडे म्हणाले, "संभाजी महाराजांच्या चरित्रावर बखरींमध्ये अन्याय झाला आहे. नंतरच्या काळात वा. सी. बेंद्रे यांनी त्यांचे चरित्र लिहिले आणि नंतर कमल गोखले यांनी एक चरित्र लिहिले. या दोघांनी संभाजी महाराजांच्या चरित्राला पुराव्यांच्या आधारे न्याय दिला. आता त्यांची राजनीती यावर संशोधन झाले आहे. यातून त्यांचे वास्तव जीवन, व्यक्तिमत्व, राज्यासाठी धोरणे ठरविताना दाखविलेली दूरदृष्टी समजून घेता येईल."
- सीरममधील आगीसंदर्भात आलं महत्त्वाचं अपडेट; तपास पथकानं दिली माहिती
डॉ. केदार फाळके म्हणाले, "संभाजी महाराजांचे राज्य म्हणजे रयतेचेच राज्य होते. जनतेचा विचार करताना, त्यांनी लोकांना सक्षम बनविले. देव, देश आणि धर्मासाठी त्यांना प्राणांची आहुती दिली. आदर्श राज्यकर्ता, त्यांचे शौर्या आणि बलिदान यांसाठी त्यांचे आपण स्मरण केले पाहिजे." संभाजी महाराजांच्या काळातील अर्थ व्यवस्था, न्याय व्यवस्था, जमीन महसूल, वतन आणि इनाम विषयक धोरण, आदी अशा त्यावेळच्या भक्कम राजव्यवस्थांचा, तसेच त्यांच्या मोहिमांचा तपशील फाळके यांनी विषद केला.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.