pune accident
pune accident

Pune Hit And Run: किती ही क्रूरता! लोक ओरडत होते, तरी तो फरफटत नेतच होता, अंगावर काटा आणणारा Video

Hit and run case in accident Pune: भरधाव चारचाकीने दुचाकीस्वारास धडक दिली आहे. धक्कादायक म्हणजे त्यानंतर त्याने दुचाकीस्वारास फरफटत नेले आहे. ही घटना बुधवारी दुपारी चार वाजता घडली आहे.
Published on

Pune Accident: पुण्यात हिट अँड रनच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना दिसत आहे. पिंपळे गुरव मेन बस स्टॉप येथे हिट अँड रनचा प्रकार समोर आला आहे. भरधाव चारचाकीने दुचाकीस्वारास धडक दिली आहे. धक्कादायक म्हणजे त्यानंतर त्याने दुचाकीस्वारास फरफटत नेले आहे. ही घटना बुधवारी दुपारी चार वाजता घडली आहे.

सदर घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये कार चालक टूव्हिलरला फरफटत नेत असल्याचं दिसून येत आहे. चारचाकीचा चालक हा मद्यधुंद असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शीनी केला आहे.घटनेच्या थरार समोर आला असून व्हिडिओ अंगावर काटा आणणार आहे.

Loading content, please wait...