Pune Worli Hit And Run Case: 'हिट अँड रन' प्रकरणाने पुणे पुन्हा हादरलं! बीट मार्शलला इनोव्हा कारने उडवले, पोलिसाचा जागीच मृत्यू

Pune Worli Hit And Run Case in Marathi: या दुर्घटनेने शहरातील पोलिस दलात हळहळ निर्माण झाली आहे. अपघातानंतर वाहन चालक पळून गेला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस तपास करीत आहेत.
Pune Worli Hit And Run Case
Pune Worli Hit And Run Caseesakal
Updated on

पुणे: कल्याणी नगरमधील पोर्शे कार अपघात ताजा असताना मुंबईतील वरळीत हिट अँड रन प्रकरण घडले होते, ज्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. आता पुण्यातील बोपोडी भागात एक हिट अँड रन प्रकरण घडल्याने शहर पुन्हा हादरले आहे.

दुर्घटनेचा तपशील-

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बोपोडी परिसरात रविवारी मध्यरात्री दोन दुचाकीवरील पोलीस बीट मार्शलला इनोव्हा कारने उडवले. या अपघातात एका पोलिसाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला. जखमी पोलिसावर पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिस विभागात हळहळ-

या दुर्घटनेने शहरातील पोलिस दलात हळहळ निर्माण झाली आहे. अपघातानंतर वाहन चालक पळून गेला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस तपास करीत आहेत. पुण्यात हिट अँड रन प्रकरणे वाढत असल्याने शहरातील नागरिकांमध्ये चिंतेची भावना वाढली आहे.

शहरातील हिट अँड रन प्रकरणांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे पोलिस दलात अस्वस्थता आहे आणि या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे. पुण्यातील नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून सुरक्षितता राखावी अशी विनंती पोलिसांनी केली आहे.

Pune Worli Hit And Run Case
Mumbai Worli Hit and Run: शिवसेनेच्या नेत्याचा मुलगा, दहावी पास...वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा कोण आहे?

लातूरमध्ये भीषण अपघात -

लातूरमध्ये देखील असाच प्रकार समोर आला आहे. कार आणि दुचाकीच्या अपघातात पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी आहेत. लातूर -उदगीर महामार्गावर ही घटना घडली. अपघातात मरण पावलेले रवी गुळंगे हे उदगीर येथील एका शाळेत शिक्षक पदावर होते, पत्नीसह जात असताना उदगीरच्या मलकापूर जवळ स्विफ्ट डिझायर गाडी आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला.

Pune Worli Hit And Run Case
Rain Update: महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अतिमुसळधार... मुंबई-कोकणासाठी धोक्याची घंटा! रेल्वेसेवा विस्कळीत, महामार्ग बंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.