Hoarding Collapse : कवडीपाट बंद टोल नाक्याजवळ होर्डिंग कोसळले; तीन जण जखमी

सलग दोन दिवस सायंकाळी असणारा अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे ४० बाय ४० फूट लांबी रुंदीचा लोखंडी होर्डिंग कोसळल्याची घटना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ घडली.
Hoarding Collapse in kavdipat toll naka
Hoarding Collapse in kavdipat toll nakasakal
Updated on

उरुळी कांचन - सलग दोन दिवस सायंकाळी असणारा अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे ४० बाय ४० फूट लांबी रुंदीचा लोखंडी होर्डिंग कोसळल्याची घटना कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्याजवळ असलेल्या गुलमोहर लॉन्स येथे सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

या होर्डिंगखाली एक पार्क केलेली महिंद्रा पिकअप (एम एच १४ एझेड ५०९६) व एक दुचाकी (एम एच १२ क्यूएल ३४०७) या गाड्यांचे नुकसान झाले आहे. या पिकअप मध्ये असलेले भरत साबळे (वय ६०) आणि मंगेश लोंढे (वय ३५) अक्षय कोरवी (वय २७) हे जखमी झाले आहेत. तर या दुर्घटनेत संकेत माणिकसिंग परदेशी यांचा घोडाही किरकोळ जखमी झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धोकादायक होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, कवडीपाट येथील गुलमोहर लॉन्स येथे शनिवारी (ता. १८) एक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी वाजंत्री, बँड बाजा पथक लॉन्सच्या मुख्य प्रवेशद्वारावर होते. तर नवरदेव मिरवणुकीसाठी देखील घोडा थांबलेला होता. तसेच या विवाह सोहळ्यासाठी आलेल्या पाहुण्यांच्या दुचाकी, चारचाकी गाड्या पार्कींग मध्ये लावण्यात आल्या होत्या. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास पावसापूर्वी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे जवळच असणारे होर्डिंग कोसळले. सध्या पडलेले होर्डिंग २ क्रेन व कटरचे सहाय्याने हटवण्याचे काम सुरु आहे.

गतवर्षी झालेली पुण्यातील घटना असो अथवा मुंबई येथील घटना घडल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या घटनांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून त्वरित कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. महामार्गाच्या विद्रुपीकरणाकडे प्रशासनाचा काणाडोळा होत असल्याची खंत पूर्व हवेलीतील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.