गृह विलगीकरण ठरतेय अडचणीचे

लहान घरांमध्ये अंतर ठेवणे कठीण; संसर्ग पसरण्याची भिती
corona
coronasakal
Updated on

पुणे: कोरोनाच्या(corona) ओमिक्रॉन या व्हेरिएंटचा संसर्ग सध्या मोठ्या प्रमाणावर वाढत असला तरी त्याची तीव्रता कमी असल्याने बहुतांश रुग्ण गृह विलगीकरणाचाच(separation) आधार घेत आहेत. रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याची गरज पडत नसल्या होणारे गृह विलगीकरण अनेक कुटुंबांना अडचणीचे ठरू लागले आहे. विशेषतः ज्यांची घरे लहान आहेत, अशा कुटुंबांमध्ये त्याची तीव्रता जास्त आहे. लहान घरांमध्ये पुरेशी जागा नसल्याने अंतर नियमाचे पालन करणे, शक्य होत नाही. विलगीकरणासाठी आवश्यक सुविधा या घरांमध्ये उपलब्ध नाहीत. त्यामुळे गृह विलगीकरणाने काही प्रमाणात नागरिकांची डोकेदुखी वाढवल्याचे चित्र आहे.

corona
नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

यंदाच्या लाटेत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. अधिकतम रुग्ण गृह विलगीकरणातच बरे होत आहेत. मात्र आकाराने लहान असलेल्या घरांमध्ये विलगीकरणाचे पालन करणे, जिकीरीचे होत आहे. दोन किंवा तीनच खोल्या असलेल्या घरांमध्ये एकाच व्यक्तीला कोरोना झाल्यास एक खोली पूर्णपणे त्या व्यक्तीच्या वास्तव्यासाठी ठेवली जाते. परिणामी घरातील इतर सदस्यांच्या वावरावर मर्यादित येतात. त्यातच सदस्यांची संख्या जास्त असल्यास अडचणींमध्ये भरच पडते. तसेच या घरांमध्ये स्वतंत्र स्वच्छतागृहाची सोय अभावानेच असते. परिणामी रुग्णासह सर्वच सदस्यांना एकाच स्वच्छतागृहाचा वापर करावा लागतो. अशा परिस्थितीत रुग्णाचा वावर झालेला परिसर प्रत्येक वेळी सॅनिटाईज करावा लागतो.

corona
नेताजी सुभाषचंद्र बोस यांना अभिवादन

यासह वसतीगृहांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ही समस्या त्रासदायक ठरत आहे. स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे अनेक विद्यार्थी शहरात वास्तव्यास आहेत. हे विद्यार्थी राहत असलेली घरेही आकाराने लहानच असतात. त्यात गृह विलगीकरणाचे नियम पाळणे, कठीण होत आहे. त्यामुळे या वसतीगृहांमधील विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाल्यास त्याच्यासह राहणाऱ्या इतर विद्यार्थ्यांनाही संसर्ग होण्याचा धोका वाढतो आहे.

‘‘आमच्या घरातील एका तरुण सदस्याला कोरोनाची लागण झाली. लक्षणे सौम्य असल्याने घरीच विलगीकरणात राहण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. आमचे तीन खोल्यांचे घर आहे आणि घरात एकूण पाच सदस्य राहतात. इतर सदस्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असली तरी लागण झालेला सदस्य घरीच असल्याने इतरांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना संसर्ग होण्याची भिती वाटते. तसेच एका खोलीत संसर्ग झालेला सदस्य राहत असल्याने इतरांना मर्यादित वावर करता येतो. त्यामुळे काहीशी अडचण होते’’, असे एका महिलेने नाव न सांगण्याच्या अटीवर स्पष्ट केले. ‘कोविड केअर सेंटरच्या अनुपलब्धतेमुळे अडचण’

corona
लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

‘‘ज्या घरात कोरोना रुग्णाला राहण्यासाठी स्वतंत्र खोली व स्वतंत्र स्वच्छतागृह उपलब्ध असेल, त्याच घरातील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना गृह विलगीकरणात राहण्याची परवानगी आहे. इतरांनी बरे होईपर्यंत कोविड केअर सेंटरमध्ये दाखल होण्याची गरज आहे. मात्र सद्यस्थितीत या किती सेंटर सुरू आहेत, त्यात किती बेड उपलब्ध आहेत, याबाबत पुरेशी स्पष्टता नाही. त्यामुळे बहुतांश नागरिक गृह विलगीकरणातच आहेत. मात्र त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका आहे’’, असे ‘आयएमए, महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.