Pune Crime: पुणे शहरातून खुनाचा एक अतिशय भयानक प्रकार समोर आला आहे. एका अनोळखी महिलेचा खून करून तिच्या मृतदेहाचे अक्षरशः तुकडे करण्यात आले. खराडी येथील नदीपात्रात या तरुणीचे धड पोलिसांना आढळले आहे. खून झालेल्या या तरुणीचे वय अंदाजे १८ ते ३० इतके आहे. चंदननगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, खराडी परिसरात जेनी लाईट कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे. येथून जवळच असलेल्या नदीपात्रात एका महिलेचे हात पाय आणि डोके नसलेल्या अवस्थेत धड असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. मयत तरुणीची ओळख अद्याप पटली नाही. या तरुणीचे वय अंदाजे १८ ते ३० इतके आहे.