Pune : हॉटेल रात्री १२ पर्यंत खुली; महापालिकेने काढले आदेश

Hotel
HotelSakal
Updated on

पुणे : कोरोनाच्या निर्बंधामुळे बंद असलेले ॲम्युझमेंट पार्क, संग्रहालय सुरू करण्यास महापालिकेने परवागनी दिली आहे. तर हॉटेल व रेस्टॉरंट रात्री १२ पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आदेश काढले आहेत.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत आल्याने रुग्णसंख्या कमी होत आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या एक हजारच्या खाली आली असून, गंभीर रुग्णांचीही संख्या दीडशे इतकी आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने शहरात लागू केलेले कोरोना प्रतिबंधक नियम शिथिल केले जात आहेत. सध्या शहरातील सर्व हॉटेल, दुकाने रात्री अकरा पर्यंत सुरू होती, आज २०आॅक्टोबर रोजी वरिष्ट महाविद्यालये सुरू झाली असून, २२ आॅक्टोबरपासून नाट्यगृह, चित्रपटगृह देखील सुरू होत आहेत.

Hotel
...म्हणून लसीच्या ट्रायलसाठी मुलांचा सहभाग कमी; जाणून घ्या कारण

महापालिकेने आज काढलेल्या आदेशात शहरातील सर्व व्यापारी दुकाने रात्री ११ वाजे पर्यंत सुरू राहतील, रेस्टॉरंट, बार, फुडकोर्ट आठवड्याचे सर्व दिवस रात्री १२ पर्यंत खुली राहातील. या आदेशामुळे हॉटेल सुरू राहण्याची वेळ एका तासाने वाढली आहे. तसेच अम्युझमेंट पार्क, संग्रहालय, व इंडस्ट्री २२ आॅक्टोबरपासून सुरू होतील. ॲम्युझमेंट पार्कमधील पाण्यातील खेळांना अद्याप बंदी घालण्यात आली असून, केवळ कोरड्या जागेतील खेळांना परवागनी असणार आहे. हे आदेश पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाला देखील लागू असणार आहेत, असे आयुक्तांनी आदेशात नमूद केले आहे. दरम्यान, हे आदेश प्राणी संग्रहालयास लागू नसल्याने त्यासाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.