पुणे : बेल्हे येथे विहिरीत पडलेल्या बिबट्यास जीवदान

बिबट्यास वनविभागाच्या वतीने माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात हलवण्यात आले
Houdbagh leopard fell in well rescued by forest department
Houdbagh leopard fell in well rescued by forest departmentsakal
Updated on

बेल्हे : हौदबाग परिसरात एका विहिरीत पडलेल्या बिबट्यास वनविभागाने रेस्क्यू टीमच्या मदतीने विहिरीत पिंजरा सोडून सुरक्षित बाहेर काढले. दरम्यान या बिबट्यास वनविभागाच्या वतीने माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात हलवण्यात आले आहे.

बेल्हे येथे कळस रस्त्यावर हौदबाग परिसरात हरकचंद बोरा यांच्या शेताजवळील विहिरीत अंदाजे दीड वर्षे वयाचा एक बिबट्या पडला असल्याचे आज स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. संबंधितांनी ही माहिती तातडीने वनविभागाला कळवली. यावेळी बिबट्याला पाहण्यासाठी विहिरीच्या कठड्याभोवती नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दरम्यान भक्षाचा पाठलाग करताना अथवा रस्ता क्रॉस करताना वाहनांच्या आवाजामुळे घाबरून रात्रीच्या वेळी हा बिबट्या विहिरीत पडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बिबट्या विहिरीत पोहून दमल्याने तो विद्युत मोटारीच्या पाईपचा आधार घेण्याचा प्रयत्न करीत होता. ग्रामस्थांनी दोर बांधून चौपाई विहिरीत सोडल्यानंतर हा बिबट्या चौपाईवर विसावला होता. दरम्यान वनविभागाने रेस्क्यू टीमच्या मदतीने विहिरीत पिंजरा सोडून बिबट्याला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढले. दरम्यान या बिबट्यास वनविभागाच्या वतीने माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रात हलवण्यात आले असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

१) बेल्हे (ता. जुन्नर) येथे हौदबाग परिसरात विहिरीत पडलेल्या बिबट्यास पाहण्यासाठी कठड्याभोवती नागरिकांनी केलेली गर्दी.

२) बेल्हे (ता. जुन्नर) येथे हौदबाग परिसरात विहिरीत एका विहिरीत पडलेला बिबट्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()