प्लाझ्मा दान करताय? मनातील शंका दूर करा

नागरिकांच्या शंकांचे निरसन
plasma
plasmaesakal
Updated on

प्लाझ्मा म्हणजे काय?

उत्तर - प्ला्झ्मा हा रक्तातातील एक पिवळसर द्रव घटक असून त्याचे रक्तातील प्रमाण सुमारे 55 टक्के इतके असते. त्यात जीवनावश्यक घटकद्रव्ये, पेशी आणि विशेषतः प्रथिने असतात.

प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय?

उत्तर - कोरोना आजारातून संपूर्णतः बऱ्या झालेल्या व्यक्तीचा सुमारे 28 दिवसांनंतर प्लाएझ्मा काढून तो कोरोनामुळे गंभीर स्थितीत असलेल्या व्यक्तीला देण्याची प्रक्रिया म्हणजे प्लाझ्मा थेरपी होय.

plasma
प्लाझ्मा तुटवडा रोखण्यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांना एफडीएचे आदेश

प्लाझ्मा दान कोण करू शकतात?

उत्तर - ज्यांचे वय 18 ते 60 दरम्यान आहे, ज्यांचे वजन 50 किलोपेक्षा जास्त आहे, जी व्यक्ती कोरोना आजारातून पूर्ण बरी झालेली असून डिश्चार्ज किंवा होम क्वारंटाईनच्या सुमारे 28 दिवसांनंतर प्लाझ्मा दान करू शतात. डोनरच्या अॅटिब़ॉडीज आधी टेस्ट केल्या जातात. प्रमाण योग्य असल्यास प्लाझ्मा घेतला जातो.

एक रक्तदाता किती मिली प्लाझ्मा दान करू शकतो?

उत्तर - साधारणपणे 400 मिली प्लाझ्मा दान करू शकतात.

plasma
पुण्यात ऑक्सिजनची आणीबाणी

एका गरजू व्यक्तीला किती मिली प्लाझ्मा देण्यात येतो?

उत्तर - एका रुग्णाला एका वेळी 200 मिली प्लाझ्मा देण्यात येऊ शकतो

एकदा प्लाझ्मा दान केल्यावर पुन्हा किती कालावधीनंतर रक्तदाता प्लाझ्मा दान करू शकतो?

उत्तर - सुमारे 7 ते 15 दिवसांनंतर पुन्हा दान करू शकतात.

plasma
माजी खासदार संजय काकडेंना अटक; गजा मारणे प्रकरण भोवणार

प्लाझ्मा दान केल्यामुळ कोणते दुष्परिणाम होतात का?

उत्तर- कोणतेही दुष्पपरिणाम होत नाहीत, रक्तदात्याने दान केलेला प्लाझ्मा शरीर काही तासांत पुन्हा तयार करते

प्लाझ्मा दान करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी?

उत्तर - योग्य पौष्टीक आहार, पुरेशी झोप, शक्यतो द्रव पदार्थांचे सेवन जास्त असावे. स्वतःला सध्या आणि तत्पूर्वी असलेल्या आजाराबद्दल आणि सध्या सुरू असलेल्या औषधांबद्दल डॉक्टरांना संपूर्ण माहिती द्यावी

कोरोना आजारातून बरी झालेली व्यक्ती किती दिवसांपर्यंत प्लाझ्मा दान करू शकते?

उत्तर - कोरोनातून संपूर्णतः बरी झालेली व्यक्ती सुमारे 3- 4 महिन्यांपर्यंत प्लाझ्मा दान करू शकते. (पहिले 14 दिवस आणि बरे झाल्यानंतरचे 28 दिवस सोडून नंतर)

Related Stories

No stories found.