चारशेहून अधिक कुटुंबाना शिधा देत माणुसकीचे दर्शन

शीख हेल्पलाइनच्या राज सिंग यांनी गोरगरिबांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
Help
HelpSakal
Updated on

पुणे - कोरोनामुळे (Corona) अनेकांच्या हातचे रोजगार (Employment) गेले, अनेकांच्या हातातील छोटे-मोठे कामही परिस्थितीने हिरावून घेतले. एकीकडे हाताला काम (Work) नाही, खर्च करण्यासाठी दमडी नाही, अशा परिस्थितीत पाच-सहा जणांचे कुटुंब (Family) जगवायचे कसे ? त्यांना किमान एकवेळचे अन्न (Food) द्यायचे तरी कुठून ? अशा विवंचनेत हजारो गरीब, कष्टकरी आहेत. नेमक्‍या अशा गरजू लोकांचा (Needy People) शोध घेऊन त्यांना एक महिना पुरेल इतका शिधा (किट) (Kit) देत शीख हेल्पलाइनने (Shikh Helpline) माणुसकीचे (Humanity) दर्शन घडवले. एक, दोन नव्हे तर आतापर्यंत ४०० हून अधिक कुटुंबांना किराणा मालाचे किट वाटप करीत, प्रेमाचा घास भरविण्याचे काम केले आहे. (Humanity Giving Rations to More Than Four Hundred Families by Shikh Helpline)

शीख हेल्पलाइनच्या राज सिंग यांनी गोरगरिबांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पोहे, गहू, तांदूळ, तूरडाळ, चणाडाळ, खाद्यतेल, साबुदाणा, शेंगदाणे, चहा, जीरा, मोहरी अशा वस्तूंचे किट तयार केले. त्यानंतर मार्चपासून हे किट सिंग यांनी थेट गरीब, गरजूंच्या हातात स्वतः देण्यास सुरवात केली. जनता वसाहत, येरवडा, यमुनानगर, विमाननगर, धानोरीतील राखपसरे वस्ती, हडपसरमधील रामटेकडी, वैदूवाडी अशा वेगवेगळ्या भागातील वस्त्यांमधील नागरिकांना त्यांनी मदतीचा हात दिला. त्यांच्या या कामामध्ये मॉरिस भिसे, रोहन उंबरजे, अनघा घाटोळे यांचाही हातभार लागत आहे.

Help
राजगड किल्ल्यावर रोपवे करण्याला विरोध

वाचवले रुग्णांचे जीव

गरिबांच्या पोटाला आधार देतानाच दुसरीकडे शीख हेल्पलाइनने कोरोनाबाधीत व्यक्तींना ऑक्सिजनची भासणारी गरज लक्षात घेऊन, अनेक नागरीकांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्याचीही जबाबदारी पार पाडली. त्यामुळे अनेक नागरिकांचे जीव वाचण्यास मदत झाली.

कोरोनामध्ये सर्वाधिक फटका बसलेल्या गरिबांच्या पोटाला दोन घास मिळावेत, म्हणून हा उपक्रम सुरू केला. शीख समाजबांधव, मित्रमंडळी, नातेवाईक, ओळखीच्या व्यक्ती आपापल्या इच्छेनुसार देणगी देतात. त्यातूनच गिरीश राठी यांच्यासारख्या विक्रेत्यांकडून दर्जेदार व रास्त दरात किराणा मालाचे किट खरेदी करून, ते शहराच्या वेगवेगळ्या भागातील गरीब, गरजू नागरिकांपर्यंत पोचवीत आहोत.

- राज सिंग, संस्थापक व मुख्य समन्वयक, शीख हेल्पलाइन

कोरोनामुळे माझे धुणी भांड्यांची कामे गेली. पतीची सेंट्रींगची कामेही बंद पडले. त्यामुळे कसेबसे जीवन जगत आहोत. सिंग यांनी धान्याचे किट दिल्यामुळे आमच्यासारख्या गरीब कुटुंबांना काही दिवसांसाठी तरी किमान आधार मिळाला.

- रूपा कांबळे, घरकामगार, जनता वसाहत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.