Pune Exam : शेकडो विद्यार्थी परीक्षेला मुकले ; ‘आयऑन डिजिटल’च्या कारभाराचा उमेदवारांना फटका

अन्न पुरवठा निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेसाठी शरद रविवारीच नाशिकहून पुण्यात दाखल झाला होता. हडपसर येथील आयऑन डिजिटल केंद्रावर परीक्षा असल्याने तो सोमवारी सकाळीच तेथे दाखल होतो.
Pune Exam
Pune Exam sakal
Updated on

पुणे : अन्न पुरवठा निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेसाठी शरद रविवारीच नाशिकहून पुण्यात दाखल झाला होता. हडपसर येथील आयऑन डिजिटल केंद्रावर परीक्षा असल्याने तो सोमवारी सकाळीच तेथे दाखल होतो. मात्र, सूचना देणारा कोणताही फलक त्याला दिसत नाही. केंद्रावर दोन प्रवेशद्वार असल्याने तो एका ठिकाणी थांबतो. आत जाताना ‘तुमचे प्रवेश पलीकडून आहे’ असे सांगितले. तो धावत दुसऱ्या गेटवर पोहोचतो, पण तोपर्यंत गेट बंद केलेला असतो. शरदसारखे शेकडो विद्यार्थी केंद्राच्या भोंगळ कारभारामुळे परीक्षेला मुकले.

राज्यातील सरळसेवा भरती वारंवार कोणत्या ना कोणत्या वादात अडकत आहे. मृदा व जलसंधारण, तलाठी, आरोग्य भरतीतील घोटाळ्यानंतरही सरळसेवा भरतीत कोणतेही बदल झालेले नाही. सोमवारी सकाळी हडपसर परिसरातील रामटेकडी येथील केंद्रावर योग्य सूचना नसल्याने शेकडो विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले आहे. राजेश सांगतो, ‘‘आम्ही वेळेवर केंद्रावर दाखल झालो. एकाच ठिकाणी दोन परीक्षा असल्याने कोणत्या गेटवर उभे राहायचे हे सांगणे गरजेचे होते. त्यासंबंधी केंद्राने एकही फलक लावला नाही. एक हजार रुपये परीक्षा शुल्क घेतले आहे. तरीही हा गोंधळ आहे.’’ वेळेच्या आधीच गेट बंद झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला.

निरुत्तरित प्रश्‍न

  • परीक्षेच्या सूचना देणारी नोटीस वेळेत का लावली नाही?

  • वेळेआधीच प्रवेशद्वार का बंद केले?

  • चूक नसतानाही ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा बुडाली त्यांना न्याय मिळणार का?

  • विनवणी करूनही केंद्रातील अधिकारी उर्मटपणे का वागले?

Pune Exam
Pune Crime : चापट मारल्यामुळे महिलेकडून पतीवर चाकूने वार; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

सोमवारी सकाळी हडपसर परिसरातील रामटेकडी येथील केंद्रावर योग्य सूचना नसल्याने शेकडो विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले आहे. राजेश सांगतो, ‘‘आम्ही वेळेवर केंद्रावर दाखल झालो. एकाच ठिकाणी दोन परीक्षा असल्याने कोणत्या गेटवर उभे राहायचे हे सांगणे गरजेचे होते. त्यासंबंधी केंद्राने एकही फलक लावला नाही. एक हजार रुपये परीक्षा शुल्क घेतले आहे. तरीही हा गोंधळ आहे.’’ वेळेच्या आधीच गेट बंद झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला.

निरुत्तरित प्रश्‍न

  • परीक्षेच्या सूचना देणारी नोटीस वेळेत का लावली नाही?

  • वेळेआधीच प्रवेशद्वार का बंद केले?

  • चूक नसतानाही ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा बुडाली त्यांना न्याय मिळणार का?

  • विनवणी करूनही केंद्रातील अधिकारी उर्मटपणे का वागले?

परीक्षेची साधी नोटीसही केंद्रावर लावली नाही. गलथान कारभारामुळे परीक्षेच्या पहिल्या सत्रातच शेकडो विद्यार्थ्यांच्या करिअरचे नुकसान झाले आहे. महागडे परीक्षा शुल्क घेऊनही इतका ढिसाळ कारभार का?

- राहुल, परीक्षार्थी

मी साडेतीनशे किमीचा प्रवास करत परीक्षेसाठी पुण्यात आले. परिस्‍थिती नसतानाही राहण्याची व्यवस्था केली. केंद्रावरही वेळेत आले, पण परीक्षेचे साधे नावही लिहिलेले नाही. परीक्षा बुडाल्यावर यांनी पोस्टर लावले. आम्हाला परीक्षेची संधी मिळणार का नाही?

- श्र्वेता, परीक्षार्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.