Pune Crime News: पत्नी आणि आठ वर्षाच्या मुलाचा खून करून ४४ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औंध परिसरात घडली. हा प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला. औंध परिसरात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
पुण्यातील औंध परिसरात एका बिल्डिंग मध्ये ३ जणांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. औंध भागातील एका बिल्डिंगमध्ये नवरा बायको आणि मुलगा असे ३ मृतदेह सापडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आयटी अभियंता असलेल्या तरुणाने बायको आणि आठ वर्षीय मुलाला पॉलिथीन बॅगने दाबून त्यांची हत्या केली आणि त्यांनर स्वतः गळफास घेतला आहे.
हा तरुण पश्चिम बंगालचा असल्याचे कळत असून सुदिप्तो गांगुली (वय ४४, रा. औंध) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. तो टीसीएस कंपनीमध्ये कामाला होता. त्याने पत्नी आणि आठ वर्षाच्या मुलाचा खून करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज चतुर्श्रुंगी पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिघेजण हरविल्याची तक्रार चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री दाखल झाली होती. गांगुली हा मंगळवारी रात्री फोन उचलत नव्हता. त्यामुळे त्याच्या बंगळुरू येथील भावाने मित्रांकरवी मंगळवारी रात्री सुदिप्तो, त्याची पत्नी आणि मुलगा हरविल्याची तक्रार चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दिली.
बुधवारी सकाळी सुदिप्तोचा भाऊ पुण्यात आला. पोलिसांनी दुपारी सुदिप्तो गांगुली यांचे औंध परिसरातील घर गाठले. त्यावेळी त्यांना घरात तिघांचे मृतदेह आढळून आले. सुदिप्तोच्या मुलाच्या आणि पत्नीच्या तोंडाला पॉलिथीनची बॅग बांधलेली दिसून आली.
या घटनेमागील कारण समजू शकले नाही. याबाबत माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, या घटनेची माहिती घेत आहेत.
सुदिप्तो हा आधी आयटी क्षेत्रात काम करत होता. तसेच ७-८ महिन्यांपूर्वी त्याने आयटी कंपनी मधील नोकरी सोडून एक व्यवसाय करायचे ठरवले होते. याच व्यवसायात त्याचे मोठे नुकसान झाल्यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे
बायको आणि मुलाला सुदीपतोने विष दिले आणि त्यानंतर त्यांचे पॉलिथिन बॅगने तोंड आवळून निर्घृण हत्या केल्याचा संशय व्यक्त होतो आहे. दरम्यान घरातून कुठलीही सुसाईड नोट अद्याप सापडलेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.