पुणे - पतीला डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करीत तसेच त्याचा गळा आवळून पत्नीनेच खुन केला. त्यानंतर पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याचा बनाव पत्नीने रचला. मात्र, अंत्यसंस्काराच्या वेळी मुलीनेच आपल्या वडीलांना आईने मारल्याची माहिती नातेवाईकांना दिली. त्यानंतर खुनाच्या प्रकाराला वाचा फुटली. याप्रकरणी खडक पोलिसांनी (Khadak Police) महिलेस ताब्यात घेतले आहे. ही घटना सोमवारी रात्री साडे अकरा वाजता गुरुवार पेठेत घडली. (husband murdered by wife show off suicide)
राधिका दिपक सोनार (वय 34,प रा. गुरुवार पेठ) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे. तर दिपक बलवीर सोनार (वय 36) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रारंभी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. तपासानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपक सोनार हा जुन्या वाड्यात सुरक्षा रक्षकाचे काम करीत होता. तो त्याची पत्नी व मुलीसोबत गुरुवार पेठेतीलच एका वाड्यात राहाता होता. तर त्याची पत्नी राधिका ही मध्यवस्तीतील एका कपड्याच्या दुकानात काम करते.
दिपकला दारुचे व्यसन असून तो दररोज रात्री घरी आल्यानंतर पत्नी समवेत भांडणे करीत. तसेच, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यात सातत्याने भांडणे होत असत. सोमवारी रात्री राधिका कामावरून घरी आल्यानंतरही त्यांच्यात वाद झाले. त्यावेळी तिने दिपकला लाकडी बॅटने मारहाण केली. त्यानंतर त्याचा गळा दाबल्याने दिपकचा मृत्यू झाला. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून राधिकाने दिपकचा मृतदेह उचलून बाधरूमध्ये नेऊन त्याने गळफास घेतला असल्याचा बनाव रचला. त्यानंतर ती दोन दिवस बाहेर गेली.
परत आल्यावर तिने पतीने गळफास घेतल्याचे इतरांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवून अकस्मात मृत्यूची नोंद केली. दरम्यान, अंत्यसंस्काराच्यावेळी त्यांच्या मुलीने आईनेच वडीलांना मारल्याचे काही नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी तपास करून महिलेस ताब्यात घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.