सॅनिटायझरच्या दुष्परिणामांपासून मिळेल मुक्तता; 'हायपोक्‍लोरस ऍसिड' आहे सुरक्षित पर्याय

Prevent_Corona
Prevent_Corona
Updated on

पुणे : कोरोना विषाणूंचा प्रसार रोखणारे प्रभावी शस्त्र म्हणजे वारंवार हात स्वच्छ धुणे! घर, कार्यालयांसह सार्वजनिक ठिकाणी हात स्वच्छ करण्यासाठी बहुतेक करून अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर वापरण्यात येते. खराब सॅनिटायझर किंवा सततच्या वापरामुळे हाताला पुरळ येणे, रॅशेस पडणे आदी दुष्परिणाम होतात. एक सुरक्षित पर्याय म्हणून हायपोक्‍लोरस ऍसिडचा वापर करणे शक्‍य असून, अशा नॉन अल्कोहोलिक सॅनिटायझरसाठी 'स्वनेत्र इनोव्हेशन' स्टार्टअपने एक उपकरण बाजारात आणले आहे. 

कोरोनाच्या काळात आणि त्यानंतरही दीर्घकाळ हॅंड सॅनिटायझरचा वापर करावा लागणार आहे. त्यासाठी पूर्णतः सुरक्षित आणि स्वस्तात उपलब्ध होणाऱ्या 'सॅनिटायझर लिक्विड'ची गरज आहे. नैसर्गिक पद्धतीने तयार होणारे सौम्यआम्ल 'हायपोक्‍लोरस ऍसिड' एक उत्तम पर्याय असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे, पण त्यासाठी अस्पर्श वितरक (कॉंटॅक्‍टलेस डिस्पेन्सर) बाजारात उपलब्ध नव्हता. याचीच दखल घेत स्वनेत्रने 'मोबिओक्‍लीन एचएस'हे उपकरण बाजारात आणले आहे. 

हायपोक्‍लोरस ऍसिडची वैशिष्ट्ये : 
- सौम्य आम्ल असलेला हे रसायन मानवी शरीरातही जिवाणूविरोधी म्हणून काम करते.
- शुद्ध पाणी, मीठ आणि व्हिनेगर च्या मिश्रणातून हे आम्ल बनविता येते. 
- जपानमध्ये मागील चाळीस वर्षांपासून याचा शस्त्रक्रियेचे साहित्य निर्जंतुक करण्यासाठी वापरण्यात येत आहे. 
- एका लिटरला फक्‍त दोन रुपये खर्च येतो. 
- याचे दुष्परिणाम मानवी शरीरावर होत नाही.  
- फळे, पालेभाज्या आणि वस्तूंचे निर्जंतुकीकरण करते.

डिस्पेंसरची वैशिष्ट्ये : 
- मीठ आणि पाणी टाकल्यावर हे उपकरण हायपोक्‍लोरस ऍसिड तयार करते. 
- साठवण क्षमता एक लिटर असून सुमारे 500 स्प्रे यातून बाहेर पडतात. 
- मोठी आस्थापने, लघु उद्योग, आयटी कंपन्या आदी सार्वजनिक ठिकाणी याचा वापर शक्‍य 

कोरोनाच्या आधीपासून आम्ही निर्जंतुकीकरणासंबंधी काम करत आहे. हायपोक्‍लोरस ऍसिडमुळे विषाणूजन्य आणि जिवाणूंचा नायनाट होतो. म्हणून आम्ही यावर काम केले. मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाल्यास उपकरणाची किंमत अजून कमी होईल. 
- राजीव सन्याल, संचालक, स्वनेत्र इनोव्हेशन

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.