Dilip Walse Patil : मी स्थानिक शेतकऱ्यांच्या सोबत ; सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गात जमीन जाणाऱ्या बाधित शेतकऱ्यांचे समाधान होईल असे प्रयत्न करू
Dilip Walse Patil
Dilip Walse Patilesakal
Updated on

पारगाव : पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गात जमीन जाणाऱ्या बाधित शेतकऱ्यांचे समाधान होईल असे प्रयत्न करून मंत्रीमंडळात निर्णय घेणारे आम्हीच असल्याने शेतकऱ्यांचे असणारे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असे सांगुन मी स्थानिक शेतकऱ्यांच्या सोबत असल्याची ग्वाही सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

लोणी ता. आंबेगाव येथील महादेव मंदिरात आज शनिवारी पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गात जमीन जाणाऱ्या बाधित शेतकरी व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडाळाचे अधिकारी यांची एकत्रित बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी दिलीप वळसे पाटील बोलत होते.

Dilip Walse Patil
Nashik News : मागसवर्गीय मुलींच्या वसतिगृहात प्रवेश सुरू

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (पुणे) चे अप्पर जिल्हाधिकारी व्ही. आर. आरगुंडे, भुसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, अनिल वाळुंज, रविंद्र करंजखेले, अशोक आदक पाटील, बाळशिराम वाळुंज, लोणीच्या माजी सरपंच ऊर्मिला धुमाळ, उद्धवराव लंके, धामणीच्या सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, खडकवाडीचे माजी सरपंच अनिल डोके, काठापूर बुद्रुक चे सरपंच अशोक करंडे, वैभव उंडे, पोंदेवाडीचे माजी उपसरपंच संदीप पोखरकर, पाबळचे सरपंच सचिन वाबळे, निरगुडसरचे माजी उपसरपंच रामदास वळसे पाटील, निलेश पडवळ, गुरुदेव पोखरकर, उदय डोके, सागर जाधव, पुष्पलता जाधव, मयुर सरडे उपस्थित होते.

Dilip Walse Patil
Nashik News : डंपरमधून पडणारी वाळू, खडी बेतते जीवावर!

अप्पर जिल्हाधिकारी व्ही. आर. आरगुंडे यांनी चित्रफितीच्या माध्यमातुन महामार्गाबाबत सविस्तर सादरीकरण केले महामार्गाबाबत नोटिफेकेशन निघाले असुन भुसंपादन प्रक्रिया सुरु झाली आहे. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शेतकऱ्यांचे हित पाहुन मोबदला दिला जाणार असुन यामध्ये कोणीही एजंट नसणार असून शेतकरी व प्रांताधिकारी यांच्या मध्ये पारदर्शक व्यवहार असणार आहे. या महामार्गाने पुणे, मुंबई, नाशिक असा सुवर्ण त्रिकोण साधला जाणार आहे या महामार्गासाठी सुमारे नऊ हजार कोटी खर्च केले जाणार असल्याचे सांगून नागरिकांनी उपस्थित केलेल्या शंकाचे निरसन केले. विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

Dilip Walse Patil
Chhagan Bhujbal News: मंच हाकेंचा, तोफ भुजबळांची, निशाणा जरांगेंवर..

श्री. वळसे पाटील पुढे म्हणाले या महामार्गाबाबत शेतकऱ्यांच्या मनात अनेक शंका होत्या कमी दरात जमिनी देण्यास विरोध असणे स्वभाविक आहे शेतकऱ्यांच्या विरोधात एकतर्फी निर्णय घेतला जाणार नाही हा काही एका तालुक्याचा प्रश्न नाही खेड, शिरूर, आंबेगाव, जुन्नर व संगमनेर या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या निगडीत हा प्रश्न आहे याबाबत स्थानिक नागरिक, शेतकरी व खातेदार यांच्या बरोबर चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. पाबळ चे माजी सरपंच सोपान जाधव म्हणाले जमीन आमची जाणार आहे त्यामुळे शासनाने या महामार्गाबाबत स्थगिती असो किंवा इतर कोणताही निर्णय घेताना बाधित शेतकऱ्यांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा परस्पर निर्णय घेऊ नये निवडुन दिलेल्या लोकप्रतिनिधींनी बाधित शेतकऱ्यांशी न बोलता परस्पर महामार्गाला विरोध करू नये असे सांगितले.

Dilip Walse Patil
Nashik News : नांदगाव तालुक्यात 90 टक्के पेरण्या पूर्ण, मात्र वरुणराजाने पाठ फिरविल्याने वाढली चिंता

महामार्गाला आमचा विरोध नाही परंतु संपादित जमिनीला योग्य मोबदला मिळाला तरच आम्ही आमची जमीन देऊ असा निर्धार बाधित शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केला.गेली आठ वर्ष रेडीरेकेनरचे दर वाढलेले नाहीत मुंबईत गेल्यावर संबधित विभागाशी बोलणार असून रेडीरेकेनरच्या दरात वाढ होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

वळसे पाटलांनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला

रविवार (दि.१६) रोजी श्री वळसे पाटील लोणी येथे आले असता त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले होते. लवकरच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना बोलाऊन शेतकऱ्यांच्या बरोबर बैठक घेऊन तुमच्या सर्व शंकांचे निरसन करू असे सांगितले होते. त्यांनी आठवड्याच्या आतच बैठक घेऊन शेतकरी व अधिकारी यांच्या मध्ये चर्चा करून घडवून आणली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.