Sharad Pawar : "बालबुद्धीने बोलतात.." आमदारावर टीका करणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांनी फटकारले

महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांची विचारधार ही देशाला एकत्र ठेवणारी, ऐक्याची आहे. त्या विचारांनीच आपल्याला पुढे जावे लागेल.
Sharad Pawar
Sharad PawarSakal
Updated on

Pune News : ‘‘नरेंद्र मोदी हे एखाद्या समाजाचे नाहीत तर देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे विशिष्ट समाजाबद्दल वक्तव्ये करून ते गैरसमज पसरवित आहेत. त्यामुळे देशाच्या ऐक्याला ते घातक आहे.

जे देशाच्या हिताचे नाही, अशा अशा विचारसरणीबरोबर मी कदापि जाणार नाही,’’ अशा स्पष्ट शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांची राष्ट्रीय लोकशाही दलात (एनडीए) सहभागी होण्याची ऑफर शुक्रवारी धुडकावून लावली.

नंदुरबार येथील जाहीर सभेत पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकेर पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ‘एनडीए’मध्ये सहभागी होण्यास सुचविले.

या पार्श्वभूमीवर पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, ‘‘मोदी यांचा संसदीय लोकशाहीवर विश्वास नाही. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांची विचारधार ही देशाला एकत्र ठेवणारी, ऐक्याची आहे. त्या विचारांनीच आपल्याला पुढे जावे लागेल.

मोदी यांची नुकत्याच झालेल्या काही जाहीर सभांमधील भाषणे पाहता, ते एखाद्या विशिष्ट समाजाला वक्तव्ये निर्माण करीत आहेत. त्यातून समाजात गैरसमज पसरत आहेत. त्यामुळे त्यांच्यासमवेत जाण्याचा प्रश्नच उदभवत नाही.’’

लोकसभा निवडणुकीचे पहिले तीन टप्पे झाले आहेत. त्या बद्दल विविध अंदाज व्यक्त होत आहेत. त्यामुळे मोदी अस्वस्थ झाले असावेत. त्यातूनच ते अशी वक्तव्ये करीत असावेत, असेही पवार यांनी नमूद केले.

पंतप्रधानपद हे घटनात्मक पद आहे. सरकारी यंत्रणेचे ते प्रतिनिधी आहेत. त्यापदावरील व्यक्तिने जाहीर बोलताना तारतम्या पाळले पाहिजे. असली, नकलीसारखी वक्तव्ये करण्याचा त्यांना अधिकार कोणी दिला ? अशी आक्षेपार्ह वक्तव्ये त्यांनी टाळली पाहिजेत.

त्यांची सध्याची भाषणे ही अयोग्य आहेत. पंतप्रधान पदाची प्रतिमा ते धुळीस मिळवित आहेत. राजकारणासाठी ते मुख्यमंत्रीपदावरील अरविंद केजरीवाल यांनाही तुरुंगात टाकत आहेत, हे अशोभणीय आहे, असेही त्यांनी नमूद केले.

अमित शहा यांनी कर्नाटकमधील जाहीर सभेत मुस्लीम समाजाचे आरक्षण करून अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) समाजाचे आरक्षण वाढवू, अशी घोषणा केली. त्यावर पवार यांनी एससी, एसटी समाजाचे आरक्षण वाढविण्यास आमची हरकत नाही. परंतु, एखाद्या समाजाचे अधिकार काढून घ्यायला नको, असे नमूद केले.

अजित पवार यांनी एका सभेत ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अशोक पवार यांना पुन्हा कसा आमदार होतो, हे बघतोच’, असे म्हटल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिल्यावर अजित पवार बालबुद्धीने बोलतात, असे म्हणत त्यांनी फटकारले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.