IAS Officer : सर्व साधारण कुटूंबातील कन्या श्रुतिशा पटाडे यांची IAS पदी निवड

बोरी बुद्रक (ता. जुन्नर) येथील अतिशय सर्व साधारण कुटूंबातील सुभाष पटाडे यांची कन्या श्रुतिशा पटाडे यांची यूपीएससी परीक्षेत २८१ व्या क्रमांकावर असुन त्यांची IAS पदी निवड झाली आहे.
shrutika patade
shrutika patadesakal
Updated on

आळेफाटा - बोरी बुद्रक (ता. जुन्नर) येथील अतिशय सर्व साधारण कुटूंबातील सुभाष पटाडे यांची कन्या श्रुतिशा पटाडे यांची यूपीएससी परीक्षेत २८१ व्या क्रमांकावर असुन त्यांची IAS पदी निवड झाली आहे.

त्यांनी व्हिजेटीआयटी मधुन बी.टेक. मेकॅनिकल ही पदवी घेतली आहे. सन २०१९ मध्येच त्यांची एम.पी.एस.सी. च्या मार्फत उपजिहाधिकारी पद मिळाले होते. परंतु त्याचवेळी यूपीएससीच्या परीक्षेत IP&TAFS हे पद मिळाले व ते स्विकारले. या पदासाठी प्रशिक्षण आणि सेवा सुरू असतानाच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेचा अभ्यास केला व आपल्या गुणवत्तेच्या आधारावर IAS होण्याचे स्वप्न साकारले. पटाडे यांची सनदी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल तिचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, आशा बुचके यांनी अभिनंदन केले.

shrutika patade
Pune : कोथरूडकरांना हवा लोकशाहीचा अनुभव ! महापालिका निवडणूक नाही, कमीत कमी वार्डसभा तरी घ्या...

प्रतिक्रिया - श्रुतिशा पटाडे

मला मोठे करण्यात माझे आई-वडील, शाळेतील शिक्षक, तसेच आमच्या बोरी गावातील सर्व ग्रामस्थांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन करत प्रेरणा दिल्याने मी या पदापर्यंत येऊन पोचले आहे.मी त्यांचे कायम ऋणी राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.