IAS Puja Khedkar vs UPSC: पूजा खेडकर हायकोर्टातही बोलली खोटं, न्यायाधीशांसमोर UPSC नं सगळचं काढलं बाहेर

IAS Puja Khedkar Case Delhi High Court: पूजाने 2012 ते 2020 दरम्यान नऊ वेळा परीक्षा दिली होती आणि त्यानंतर तिला परीक्षा देण्याचा अधिकार नव्हता. असे असूनही, तिने पुढे परीक्षा दिली आणि 2023 मध्ये ती उत्तीर्ण झाली.
IAS Puja Khedkar Case UPSC
IAS Puja Khedkar Case UPSCEsakal
Updated on

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने निलंबित प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरला नोटीस बजावली आहे. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात 26 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

पूजा खेडकरने न्यायालयात खोटा दावा केला होता की, तिची उमेदवारी रद्द केल्याचे आदेश यूपीएससीने दिले नव्हते. मात्र, आता यूपीएससीने पूजा खेडकरचा दावा खोटा असल्याची याचिका दाखल केली आहे.

यूपीएससीने याचिकेत म्हटले आहे की, पूजा खेडकरला तिच्या नोंदणीकृत मेल आयडीवर उमेदवारी रद्द करण्याबाबत माहिती देण्यात आली होती. पूजा खेडकरकडून दिल्ली उच्च न्यायालयासमोर खोटी माहिती देण्यात आली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.