आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या कुटुंबियांच्याून नावावर असलेल्या कंपनीने कर बुडवल्या प्रकरणी त्यांना कर भरण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. जर निर्धारीत वेळेत हा कर न भरल्याच कंपनीचा लिलाव करून कर वसूल करण्यात येणार आहे.
आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर यांच्या नावावर असलेल्या थर्मोव्हेरिटा कंपनीने गेल्या अनेक वर्षांपासून कर बुडवला आहे. हा कर निर्धारित वेळत न भरल्यास पालिका खेडकर यांच्या कंपनीचा लिलाव करत या कराची वसुली करणार आहे.
दरम्यान पूजा खेडकरचे प्रकरण समोर आल्यानंतर तिच्या कुटुंबियांचे अनेक गैरप्रकार समोर आले आहेत. यामध्ये मनोरमा खेडकर यांनी मुळशीतील काही शेतकऱ्यां बंदुकीचा धाक दाखवत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर मनोरमा यांना रायगडमध्ये एका हॉटेलमधून अटक करण्यात आली होती. सध्या त्या कोठडीमध्ये आहेत.
दुसरीकडे पूजा खेडकरचे वडील दिलिप खेडकर यांच्यावरही सरकारी नोकरीत असताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. त्यांच्याविरोधातही आता चौकशी सुरू झाली आहे.
पूजा खेडकरवर UPSC परीक्षेत OBC नॉन-क्रिमी लेयर कोट्याचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर या कोट्याचा लाभ घेण्यासाठी तिच्या आई-वडीलांनी घटस्फोट घेण्याच बनाव रचल्याचाही आरोप आहे.
पूजा खेडकरने एका मॉक इंटरव्ह्यूदरम्यान तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्याचे सांगितले होते. ती तिच्या आईसोबत राहते. ही फसवणूक उघडकीस आल्यानंतर पूजाविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.