IAS Pooja Khedkar: पूजा खेडकरच्या आईचा आणखी एक कारनामा, 2022चा 'तो' व्हिडिओ व्हायरल

Manorama Khedkar: दरम्यान हा व्हिडिओ 2022 मधील असून पुरावा म्हणून पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. तो आता व्हायरल होत आहे.
IAS Pooja Khedkar Viral Video
IAS Pooja Khedkar Viral VideoEsakal
Updated on

प्रशीक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरण राज्यासह देशभरात गाजत आहे. यामध्ये पूजा खेडकरने केलेल्या कारनाम्यांसह तिच्या आईचेही नवेनवे कारनामे समोर येत आहेत. पूजा खेडकरच्या आईचा यापूर्वी शेतकऱ्यांना बंदूकीचा धाक दाखवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता पूजच्या आईचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यामध्ये त्या पोलीस आणि मेट्रो अधिकाऱ्यांची हुज्जत घालताना दिसत आहेत.

दरम्यान हा व्हिडिओ 2022 मधील असून पुरावा म्हणून पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. तो आता व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये मनोरमा खेडकर पोलीस अधिकाऱ्यांवर जोर जोरात ओरडताना दिसत आहेत. यावेळी पोलिसांना त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी पोलिसांना जुमानले नाही. व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर लक्षात येत आहे की, ही घटना घडली तेव्हा रात्रीची वेळ होती. त्यावेळी रस्त्यावर शेकडो नागरिकही गोळा झाल्याचे पाहायला मिळत आहेत.

IAS Pooja Khedkar Viral Video
Pooja Khedkar : आरोपाने काही फरक पडत नाही...दिव्यांगांच्या कोट्यातून आयएएस झालेले अभिषेक सिंह कोण आहेत ?

कोण आहेत मनोरमा खेडकर?

मनोरमा खेडकर या वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई आहेत. पूजा खेडकरचे प्रकरण समोर आल्यानंतर मनोरमा खेडकर यांचेही अनेक कारनामे समोर आले आहेत. यापूर्वी त्यांच्या एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्या शेतकऱ्यांना बंदूक दाखवत धमकावत आहेत व जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान आता या प्रकरणात त्यांच्या गुन्हा दाखल झाला असून, पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

IAS Pooja Khedkar Viral Video
IAS Pooja Khedkar: पूजा खेडकर यांची उलटी गिनती सुरु? पोलिसांकडून 3 तास चौकशी, केंद्रीय समितीही चौकशी करणार

काय आहे पूजा खेडकर प्रकरण?

पूजा खेडकर ही प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी आहे. पुण्यात पोस्टींगला असताना पूजाने कार्यालयातील वरिष्ठांची केबिन बळकावल्याचा, खाजगी गाडीवर लाल दिवा लावल्याचा, युपीएससी परीक्षा देताना गैरप्रकार केल्याचा आरोप आहे.

याबरोबरच पूजा खेडकरने युपीएससी परीक्षा देण्यासाठी खोटे दिव्यांग प्रमाणपत्र आणि वयाची मर्यादा संपल्यानंतर नावात बदल करून परीक्षा दिल्याचा आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.