IAS Pooja Khedkar: पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांचे पाय खोलात; पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

IAS pooja khedkar mother manorama: पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पौड पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
IAS pooja khedkar
IAS pooja khedkar
Updated on

पुणे- वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबरोबर आता त्यांचे आई-वडील देखील गोत्यात येताना दिसत आहेत. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर आणि वडील दिलीप खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पौड पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलंय.

दोन दिवसापूर्वी मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडिओ समोर आला होता. यात त्या बंदुक दाखवून एक शेतकऱ्याला धमकावत असल्याचं दिसत होतं. याचप्रकरणी त्यांच्यावर गु्न्हा दाखल झाला आहे. जमिनीच्या वादातून शेतकऱ्यांना धमकावणे, मारहाण, शिवीगाळ , जीवे मारण्याची धमकी, पिस्तूल रोखणे इत्यादी आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

IAS pooja khedkar
Pooja Khedkar Controversy : पूजा खेडकर प्रकरणात आणखी UPSCचे आणखी काही अधिकारी अडकणार? तपासासाठी उच्चस्तरिय समिती स्थापन

व्हायरल होणारा व्हिडिओ जुना असल्याची माहिती आहे. आयएएस पूजा खेडकर यांचे प्रकरण गाजत असताना हा व्हिडिओ बाहेर आला. आता याप्रकरणी, शेतकरी पंढीनाथ कोंडाबा पासलकर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनोरमा, दिलीप खेडकर आणि दोन महिला, दोन पुरुष आणि दोन गुंडांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मुळशीमध्ये मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्यावर बंदुक रोखली होती. जमिनीच्या वादावरून त्यांनी शेतकऱ्याला धमकावलं होतं. व्हायरल होणार व्हिडिओ ५ जून २०२३ रोजीचा आहे. शेतकऱ्याने भीती पोटी यासंदर्भात तक्रार दाखल केली नव्हती. पण, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि पूजा खेडकर आरोपाच्या छायेत असताना त्यांना तक्रार दाखल करण्याचे बळ मिळाले.

IAS pooja khedkar
IAS Pooja Khedkar: पूजा खेडकरचा आणखी एक प्रताप! चोराला सोडण्यासाठी DCP वर टाकला होता दबाव

दरम्यान, पूजा खेडकर या अडचणीत सापडल्या आहेत. त्यांनी प्रशिक्षण कालावधीत खासगी गाडीवर लाल दिवा आणि महाराष्ट्र सरकारचे चिन्ह वापरल्याचा आरोप आहे. याशिवाय परवानगी नसताना दालन मागणे, शिपाई, राहण्यासाठी निवास इत्यादींची मागणी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी रिपोर्ट सादर केल्यानंतर त्यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिम जिल्ह्यात बदली झाली आहे. याशिवाय, नेमणुकीवेळी अतिविकलांगता आणि नॉनक्रिमीलियर सर्टिफिकेटचा चुकीचा वापर केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.