IAS Puja Khedkar: मनोरमा खेडकर की इंदुबाई ढाकणे? रायगडच्या लॉजमध्ये सापडले पूजाचे आई-वडील, कसं फुटलं खोट्या नावाचं बिंग?

Manorama And Dilip Khedkar: आयएएस अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत धमकी दिल्याप्रकरणी रायगडमधील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे.
Manorama Khedkar And Dilip Khedkar
Manorama Khedkar And Dilip KhedkarEsakal
Updated on

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत धमकी दिल्याप्रकरणी रायगडमधील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. यावेळी मनोरमा खेडकर आणि पती दिलीप खेडकर हॉटेलमध्ये नाव बदलून राहत होते असे समोर आले आहे.

मनोरमा खेडकर यांना अटक करण्यापूर्वी खेडकर पती-पत्नी रायगडमधील पार्वती निवास या हॉटेलमध्ये नाव बदलून राहत होते. हॉटेलच्या रजिस्टरमध्ये मनोरमा यांनी इंदुबाीई ढाकने अशा नावाने एन्ट्री केली होती तर दिलीप खेडकर यांनी दादासाहेब ज्ञानदेव ढाकने अशी एन्ट्री केली होती. याबाबतचे वृत्त साम टीव्हीने दिले आहे.

अलीकडेच पूजा खेडकरची आईही वादात सापडली होती जेव्हा तिचा हातात पिस्तूल फिरवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या घटनेनंतर पूजाचे आई आणि वडील दोघेही फरार झाले होते.

त्याचवेळी पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी मोठी माहिती दिली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांचे एसपी पंकज देशमुख यांनी सांगितले की, आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना महाड येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

दरम्यान प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना आज सकाळी पुणे पोलिसांनी अवैध बंदुक बाळगल्याप्रकरणी महाडमधून अटक केली आहे.

Manorama Khedkar And Dilip Khedkar
IFS Jyoti Mishra: देशात नक्की चाललयं तरी काय? दोन वर्षे IFS म्हणून वावरणारी ज्योती UPSC पासचं झाली नाही

मनोरमा खेडकर यांची अटक नुकत्याच समोर आलेल्या एका व्हायरल व्हिडिओमुळे झाली आहे, ज्यामध्ये त्या पुणे जिल्ह्यातील मुळशी गावात जमिनीच्या वादावरून स्थानिक शेतकऱ्यांशी भांडताना पिस्तूलीचा धाक दाखवताना दिसत आहेत.

व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. व्हायरल व्हिडिओमध्ये, मनोरमा एका शेतकऱ्याशी जोरदार वाद घालताना दिसत आहेत. पुढे त्यांनी समोरच्या शेतकऱ्या पिस्तूलीचा धाक दाखवत धमकी दिली.

Manorama Khedkar And Dilip Khedkar
IAS Pooja Khedkar: खोटा पत्ता, रेशन कार्डही खोटे... 'वायसीएम'मध्ये नेमकं काय घडलं? वाचा पूजा खेडकरचा नवा प्रताप

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी मनोरमा आणि तिचा पती दिलीप खेडकर यांचा शोध सुरू केला. पुणे ग्रामीणमधील पौड पोलिसांनी खेडकर दाम्पत्य आणि इतर पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

मनोरमा खेडकर हिला रायगड जिल्ह्यातील महाड येथून ताब्यात घेण्यात आले असून त्यांना पुण्यात आणण्यात आले आहे, असे पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.