या मार्गावर प्रवास करणार असाल, तर दवाखान्यात ॲडमिट नक्कीच होणार

या मार्गावर प्रवास करणार असाल, तर दवाखान्यात ॲडमिट नक्कीच होणार
Updated on

थेऊरफाटा ते लोणी कंद व उरुळी कांचन जेजुरी या पुर्व हवेलीमधील दोन प्रमुख मार्गावर प्रवास करणार असाल तर, जवळ मानेचा बेल्ट, मनक्याच्या डॉक्टराचा पत्ता व दवाखान्यात ॲडमिट होण्यासाठी पुरेसा पैसा, जवळ ठेवा व मगच प्रवास सुरु करा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

थेऊरफाटा ते लोणी कंद व उरुळी कांचन जेजुरी या पुर्व हवेलीमधील दोन प्रमुख मार्गावर प्रवास करणार आहात का? या प्रश्नाचे उत्तर होय असेल, तर जवळ मानेचा बेल्ट, मनक्याच्या डॉक्टराचा पत्ता व दवाखान्यात ॲडमिट होण्यासाठी पुरेसा पैसा जवळ असेल तरच या मार्गावरुन प्रवास करण्याचा बेत पक्का करा. कारण वरील दोन्ही रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे, रस्त्यात पडलेला राडारोडा व रस्त्यातुन वाहणारे पाणी व प्रवास करताना उडणारी धुळ यामुळे यामुळे या दोन्ही रस्त्यावरुन प्रवास करणे जिकीरीचे बनले आहे. 

थेऊरफाटा ते लोणीकंद व उरुळी कांचन ते शिंदवने मार्गे जेजुरी या पुर्व हवेलीमधील दोन प्रमुख रस्त्यांची अवस्था अंत्यत दयनिय बनली असुन, रस्त्यात ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे, रस्त्यात पडलेला राडारोडा व रस्त्यातुन वाहणारे पाणी व प्रवास करताना उडणारी धुळ यामुळे चारचाकी असो वा दुचाकी वाहन, या रस्त्यावरुन एक दोन वेळा प्रवास केल्यास मानदुखी, पाठदुखी अथवा सर्दी सारखे आजार होणार हे सांगण्यासाठी कोणा जोतिष्याची गरज लागणार नाही हे नक्की. वरील दोन्ही रस्त्यांची कामे त्वरीत पुर्ण होण्याची गरज निर्माण झाली आहे.

पुणे-सोलापुर महामार्गावरुन नगर रस्त्याला जाण्यासाठी थेऊरफाटा ते लोणी कंद हा एकमेव पुर्व हवेलीमधील महत्वाचा रस्ता आहे. तर उरुळी कांचनहुन पुरुंदर तालुक्यात तालुक्यातील सासवड व जेजुरीला जाण्यासाठी उरुळी कांचन ते शिंदवने मार्गे बेलसर ते जेजुरी हा तेविस किलोमिटर अंतराचा प्रमुख रस्ता आहे. वरील दोन्ही रस्ते महत्वाचे असल्याने, चार वर्षापुर्वी देवेंद्र फडणविस सरकारच्या काळात हायब्रिड अम्युनिटी अंतर्गत रस्तांची कामे मोठ्या धुमधडाक्यात सुरु करण्यात आली होती. थेऊरफाटा ते लोणी कंद या रस्त्यासाय़ी १६१ कोटी रुपये खर्च येणार असल्याचे जाहीर करुन, तत्कालीन  मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रस्त्याचे काम दोन वर्षाच्या आत पुर्ण होणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र दोन्ही रस्त्यांची कामे सुरु होऊन, चार वर्षाचा कालावधी उलटुनही, वरील दोन्ही रस्त्यांची कामे अद्यापही अपुर्ण आहेत. 

थेऊरफाटा ते थेऊर, कोलवडी मार्गे लोणी कंद या रस्तांची अवस्था अतिशय कठीण आहे. थेऊरफाटा ते थेऊर गाव या दरम्यानच्या पाच किलोमिटर अंतरात रस्ता राहिलेलाच नाही. ठिकठिकाणी पडलेले मोठे खड्डे, रस्त्यात पडलेला राडारोडा, प्रवास करताना उडणारी धुळ तर कांही ठिकाणी साचलेले पाणी अशी दयनिय अवस्था रस्त्याची झालेली आहे. त्यातच अनेकांनी रस्त्याला खेटुन बांधकामे सुरु केल्याने, रस्त्यांची अवस्था आनखी कठीण बनलेली आहे. रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामुळे प्रवास करणाऱ्यांच्या मानेला व पाठीचा कना ताण आल्याने, निकामी होण्याची शक्यता जानवते. वाहन चारचाकी असो वा दुचाकी, दोन्ही वाहनावरुन प्रवास करताना भयानक यातना सोसाव्या लागत आहे. थेऊर परीसरातील नागरीक मोठ्या प्रमानात वैतागले आहेत. याबाबत मागिल वर्षभऱापासुन रस्त्याचे काम पुर्ण करम्याबाबत मागणी होऊनही, नागरीकांच्या पदरी आश्वासनाशिवाय कांहीही पदरी पडत नाही हे वास्तव आहे. 

तर दुसरीकडे थेऊऱफाटा ते लोणी कंद या रस्त्याप्रमानेच उरुळी कांचन जेजुरी याही रस्त्याची अवस्था भयानक स्थितीत आहे. उरुळी कांचन ते शिंदवने या दरम्यान रस्ता आहे की नाहीच हेच वाहनचालकांना समजुन येत नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजुनी असलेल्या शेतामधील पाणी थेट रस्त्यावर येऊन, वाहत असल्याने वाहन चालकांना रस्त्यातील खड्डेही दिसुन येत नाहीत. यामुळे वाहन रस्त्यात आदळल्याने वाहनाचे नुकसान होण्याबरोबरच, वाहन चालकाची मान अथवा पाठीचा कणा कायमचा निकामी होण्याची भिती कायम सतावत असते. वरील दोन्ही रस्त्यांची कामे पुर्ण करावीत यासाठी, या भागातील खासदार, आमदार व स्थानिक लोकप्रतिनिधीच्याकडे वारंवार मागणी होऊनही, कामे पुर्ण होत नसल्याने नागरीकांचे मोठ्या प्रमानात हाल होत आहेत. 

अधिकारी व कंत्राटदार यांची बैठक बोलाऊन त्वरीत मार्ग काढणार- आमदार अशोक पवार
याबाबत आमदार अशोक पवार यांच्याशी संपर्क साधला असता, आमदार पवार म्हणाले, थेऊरफाटा ते लोणी कंद व उरुळी कांचन जेजुरी या दोन्ही रस्त्यांची अवस्था गंभीर आहे ही बाब खरी आहे. वरील दोन्ही रस्त्यांची कामे य़ुध्दपातळीवर मार्गी लावण्याबाबत यापुर्वीही सुचना केलेल्या होत्या. मात्र मागिल सहा महिण्यात कोरोना व सध्या सतत पडणाऱ्या पावसामुळे् वरील दोन्ही रस्त्यांच्या कामांना गती देता आलेली नव्हती. मात्र पुढील तीन ते चार दिवसात अधिकारी व कत्रांटदार याची संयुक्त बैठक बोलाऊन, वरील दोन्ही कामे त्वरीत सुरु करम्याबाबत आदेश दिले जाणार आहेत. तसेच थेऊर रस्त्यावर मरुम टाकुन, या रस्त्यांची तात्पुरती डागडुजी करण्याबाबत आजच आदेश दिला जाईल असेही पवार यांनी यावेळी स्पष्ठ केले.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.