...तर टोल न भरताच तुमचे वाहन सोडले जाणार

टोल नाक्यापासून १०० मीटरवर पिवळी रेष आखणे आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) बंधनकारक केले आहे.
Toll Naka
Toll NakaSakal
Updated on

पुणे - टोल नाक्यापासून (Toll Naka) १०० मीटरवर पिवळी रेष (Yellow Line) आखणे आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) (NHAI) बंधनकारक केले आहे. त्यामुळे १०० मीटरपेक्षा जास्त अंतरावर वाहनांच्या रांगा (Vehicle Line) असल्यास आणि त्या रांगेत तुम्हाला ताटकळावे लागले तर टोल न भरताच तुमचे वाहन सोडले जाणार आहे. (If you have to wait in line your vehicle released without paying the toll)

टोल नाक्यावर वाहने सुरळीत व जलद गतीने जाण्यासाठी ‘एनएचएआय’ने राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यावर गर्दीच्या वेळीही प्रति वाहन १० सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही, यासाठी मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार टोल नाक्यावर वाहतूक अखंडपणे सुरळीत ठेवण्यासाठी वाहने १०० मीटरपेक्षा जास्त रांगेत राहणार नाहीत, याची काळजी घेण्यात येणार आहे. बहुतांश टोल नाक्यावर फास्टॅग १०० टक्के अनिवार्य केल्यामुळे वाहनचालकांचा प्रतीक्षा कालावधी कमी झाला आहे. तरीही काही कारणास्तव १०० मीटरपेक्षा जास्त अंतरावर वाहनांच्या रांगा असल्यास टोल बूथपासून १०० मीटरच्या आत रांग येईपर्यंत, वाहनांना टोल न भरताच पुढे जाण्याची परवानगी दिली जाईल. या उद्देशाने टोल बूथपासून १०० मीटर अंतरावर पिवळ्या रेषा प्रत्येक मार्गिकेत आखण्यात येणार आहेत. टोल नाका चालकांना त्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यांना त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये आता सुधारणा करावी लागणार आहे. राज्यात एकूण ९६ टोलनाके आहेत. त्यातील ५४ टोलनाके हे ‘एनएचएआय’च्या अखत्यारित असून ४२ टोलनाके राज्य रस्ते विकास महामंडळाचे आहेत.

Toll Naka
Pune Corona: पुणेकरांना दिलासा; रुग्णसंख्या होतेय कमी

फास्टॅगचा वापर ९९ %

'एनएचआय’च्या प्रयत्नामुळे २०२१ फेब्रुवारीच्या मध्यापासून १०० टक्के कॅशलेस टोल आकारणी होत आहे. फास्टॅगच्या वाहनांची संख्या ९६ ते ९९ टक्के आहे. देशातील इलेक्ट्रॉनिक टोल संकलनाचा (ईटीसी) वाढता वापर लक्षात घेता, टोलवसुलीची कार्यक्षम व्यवस्था करण्यासाठी पुढील १० वर्षांसाठी वाहतुकीच्या अंदाजानुसार नवीन डिझाइन बनवून आगामी टोल नाके तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे, असे ‘एनएचएआय’ने स्पष्ट केले आहे.

शंभर मीटरमध्ये बसणारी वाहने...

  • कार - २० ते २५

  • ट्रक - १० ते १२

  • मिनी ट्रक - १२ ते १५

  • राज्यातील टोल नाक्यांची संख्या (NHAI) - ५४

पिवळ्या रेषेच्या नियमाबाबत महामार्ग विभागाकडून अद्याप आदेश मिळालेला नाही. तो आदेश मिळाल्यावर अंमलबजावणी कशी करायची, याबाबत निर्णय घेता येईल.

- अमित भाटिया, व्यवस्थापक, खेड शिवापूर टोल नाका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.