पाक कारागृहातील मच्छीमारांकडे दुर्लक्ष - जतिन देसाई

गुजरातमधील मच्छीमार बऱ्याचदा कळत नकळतपणे देशाच्या सागरी सीमा ओलांडतात आणि त्यांना पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सी ताब्यात घेते.
Jatin Desai
Jatin DesaiSakal
Updated on
Summary

गुजरातमधील मच्छीमार बऱ्याचदा कळत नकळतपणे देशाच्या सागरी सीमा ओलांडतात आणि त्यांना पाकिस्तानी सागरी सुरक्षा एजन्सी ताब्यात घेते.

पुणे - गुजरातमधील मच्छीमार (Fisher) बऱ्याचदा कळत नकळतपणे देशाच्या सागरी सीमा ओलांडतात आणि त्यांना पाकिस्तानी (Pakistan) सागरी सुरक्षा एजन्सी (Security Agency) ताब्यात घेते. असे कित्येक भारतीय मच्छीमार (Indian Fisher) पाकिस्तानच्या कारागृहात (Jail) वर्षानुवर्षे आहेत. भारतीय प्रशासनही याकडे दुर्लक्ष करत असून त्यामुळे मच्छीमारांच्या कुटुंबीयांवर भावनिक आणि आर्थिक असे दोन्ही संकटे (Crisis) उद्भवतात, असे मत पाकिस्तान-इंडिया पीस फोरमचे कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई यांनी व्यक्त केले.

पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे ‘क्या पानी में सरहद होती है?’ या माहितीपट दाखविण्‍यात आला. त्याचबरोबर जतिन देसाई आणि माहितीपटाचे निर्माते, दिग्दर्शक संतोष कोल्हे यांच्याशी वार्तालापचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी पुणे पत्रकार श्रमिक संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, पत्रकार प्रगती बाणखेले आदी उपस्थित होते.

Jatin Desai
...म्हणून मलाही पुण्यात राहायला यावेसे वाटतेय - रामदास आठवले

यावेळी देसाई म्हणाले, ‘ज्या प्रकारे दोन देशांच्या सीमा अधोरेखित करण्यात आल्या आहेत, त्याचप्रमाणे महासागर, समुद्राच्या हद्दी ही वाटण्यात आल्या आहेत. गुजरातचे मच्छीमार खोल समुद्रात मासे पकडण्यासाठी जातात. सौराष्ट्र भागातील मच्छीमार शतकानुशतके हा व्यवसाय करत आहेत. अशात भारतीय समुद्रातील सीमा ओलांडून हे मच्छीमार पाकिस्तानच्या समुद्रात पोचतात आणि पाकिस्तान या मच्छीमारांना पकडते. पकडण्यात आलेले मच्छीमार हे केवळ व्यावासायासाठी समुद्रात जातात. या पलिकडे त्यांचा दुसरा कोणताच हेतू नसतो. परंतु तरी ही त्यांना कित्येक महिन्यांचा तुरुंगवास सहन करावा लागतो. असंच काही पाकिस्तानच्या मच्छीमरांसोबत भारतीय समुद्राच्या हद्दीत घडते.’’

श्रीलंका, बांगलादेश, म्यानमार या देशांमध्ये जाणाऱ्या मच्छीमारांना ही पकडले जाते, पण त्यांना शिक्षेच्या कावलावधीनंतर सोडण्यात ही येते. मच्छीमारांची अडचण लक्षात घेता पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांनी ‘नो अरेस्ट’ हे धोरण स्वीकारले पाहिजे. असे झाल्यास दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्यास मदत होईल, असे देसाई यांनी नमूद केले. सूत्रसंचालन पत्रकार संघाचे उपाध्यक्ष डॉ. सुजित तांबडे यांनी केले.

Jatin Desai
मेट्रोने २२ हजार जणांचा प्रवास; एका दिवसात कमावले....

कायद्यानुसार पकडण्यात आलेल्या मच्छीमारांना पकडल्यानंतर ९० दिवसांच्या आत त्यांचे राष्ट्रीयत्व पटवून देण्यासाठी कॉन्सुलर एक्सेसची सुविधा मिळते. परंतु भारतीय प्रशासनाकडून याची दखल घेतली जात नाही. अशात या मच्छीमारांना कित्येक महिने, वर्षे कारागृहातच शिक्षा भोगावी लागते.

- संतोष कोल्हे, निर्माते-दिग्दर्शक

समुद्रात जाण्यामागची कारणे...

  • अरबी समुद्रातील काही भाग जो भारताच्या हद्दीत येतो तिथे माश्‍यांची संख्या कमी होत आहे

  • उद्योगांमुळे निर्माण होणारा कचरा प्रक्रियेशिवाय थेट पाण्यात सोडणे

  • यामुळे समुद्राच्या प्रदूषणात वाढ

  • समहासागराच्या तापमानवाढीचाही मासेमारीवर परिणाम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.