IKEA Store in Pune : पुणेकरांसाठी खुशखबर! मुंबईतील दुकान बंद करून पुण्यात सुरू होणार आयकियाचं नवं स्टोअर? कंपनीचे संकेत

IKEA Mumbai Store : आयकियाच्या R-City ब्रँचमध्ये सुमारे 100 लोक काम करतात. या सर्वांना कंपनीच्या मुंबई आणि इतर ठिकाणीच्या ब्रँचेसमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
IKEA Store in Pune
IKEA Store in PuneeSakal
Updated on

IKEA to shut down Mumbai R-City Mall Store : स्वीडिश फर्निचर रिटेलर कंपनी IKEAने 2022 साली मुंबईत आपलं नवीन शोरूम सुरू केलं होतं. मात्र आता हे स्टोअर बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. R-City मॉलमध्ये हे शॉप होतं. यानंतर आता पुण्यात एक आयकिया स्टोअर सुरू करण्याचे संकेत कंपनीने दिले आहेत.

मुंबई आर सिटी मॉलमध्ये (Mumbai R-City Mall) असणारं आयकियाचं दुकान हे सुमारे 70,000 स्क्वेअर फूट परिसरात पसरलं होतं. हे शॉप यावर्षीच्या मध्यापर्यंत बंद करण्यात येणार आहे. यानंतर आयकिया वरळी, आयकिया नवी मुंबई आणि ऑनलाईन स्टोअर एकत्र करणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. (IKEA Mumbai Store)

"मुंबईमध्ये वाढीचं आमचं लक्ष्य आहेच. सोबतच आम्ही शहरासाठी नवीन ओम्नी-चॅनल फॉरमॅटची पाहणी करत आहोत. सध्याच्या नवी मुंबई साईटला रिटेल डेस्टिनेशन म्हणून विकसित करण्याकडे, तसंच पुण्यात आमचा फिजिकल प्रेझेंस वाढवण्याकडे कंपनीचा कल असणार आहे", असं आयकियाने आपल्या निवेदनात म्हटलं. (IKEA Store in Pune)

IKEA Store in Pune
Pune Drug News : 'कोवळ्या वयातील वाढती नशा चिंताजनक', पुण्यातील त्या व्हायरल व्हिडीओनंतर परदेशींनी व्यक्त केली चिंता

कामगारांना करणार शिफ्ट

आयकियाच्या R-City ब्रँचमध्ये सुमारे 100 लोक काम करतात. या सर्वांना कंपनीच्या मुंबई आणि इतर ठिकाणीच्या ब्रँचेसमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आयकियाचे मुंबईमधील इतर दोन स्टोअर्स कार्यरत राहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.