Digital Hoarding : पुण्यातील होर्डिंगवरील कारवाई थंडावली

होर्डिंग अधिकृत असले तरीही नियमभंग करणाऱ्या अशा धोकादायक होर्डिंगवर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केले जातील.
Illegal Hoarding
Illegal Hoardingsakal
Updated on

पुणे - होर्डिंग अधिकृत असले तरीही नियमभंग करणाऱ्या अशा धोकादायक होर्डिंगवर कारवाई करून त्यांचे परवाने रद्द केले जातील. यासाठी महापालिकेने तपासणी सुरू केल्याचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र आकाशचिन्ह विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांकडून होणारी ही कारवाई थंडावली आहे. नोटिसा देण्यापलीकडे काहीही झालेले नाही. तसेच होर्डिंग व्यावसायिकांनी आयुक्तांची भेट घेतल्याने त्यांच्याही अडचणी ऐकून घेतल्या जाणार आहेत.

घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुण्यातील वाघोली, शेवाळवाडी, मोशी येथेही होर्डिंग पडल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे शहरात चौकाचौकांत, रस्त्यावर मोठीच्या मोठी होर्डिंग उभी राहिल्याने सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला. घाटकोपर येथे घटना घडल्यानंतर पुण्यातील धोकादायक होर्डिंगवर कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला.

आयुक्तांनी स्वतः टिळक चौक ते जंगली महाराज मंदिर या दरम्यानच्या होर्डिंगची पाहणी केली. त्यानंतर प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांना त्यांच्या हद्दीतील अनधिकृत होर्डिंग, परवानगी घेऊन होर्डिंगमध्ये परस्पर बदल करणे, नागरिकांना धोका होईल, अशा पद्धतीने होर्डिंग उभे करणे, हवा, प्रकाश येण्यास अडथळा करणाऱ्या होर्डिंगवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

तसेच, याचे सर्वेक्षण महापालिका स्वतः करेल. सहाय्यक आयुक्त, उपायुक्त आणि आयुक्त स्वतः होर्डिंगचा परवाना रद्द करण्याबाबत निर्णय घेतील. नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण केला जाणार नाही असे, असे आयुक्त भोसले यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.

आयुक्तांनी सात दिवसांत धोकादायक ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. शहरात हजारोंच्या संख्येने नियमबाह्यपणे होर्डिंग उभी असताना प्रत्यक्षात १६५ होर्डिंग मालकांना नोटीस देण्यात आली. त्यांपैकी सुमारे ६० होर्डिंगवर कारवाई करण्यात आली. उर्वरित होर्डिंगवर कारवाई झालेली नाही.

जाहिराती गायब; सांगाडे कायम

वादळात होर्डिंग पडत असल्याने व्यावसायिकांनी होर्डिंगवरील जाहिराती काढून टाकल्या आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी केवळ लोखंडाचे मोठे सांगडा उभे असल्याचे दिसून येत आहे. तसेच एखाद्या व्यावसायिकाचे अनेक होर्डिंग असल्यास, त्यात नियमबाह्यपणे बदल केले असले तरी केवळ कारवाई दाखविण्यासाठी एखाद-दुसऱ्या होर्डिंगला नोटीस बजावण्यात आली आहे.

  • १६५ - मालकांना नोटीस

  • ६० - जणांवरच कारवाई

शहरातील होर्डिंगवरील कारवाई थांबलेली नाही. क्षेत्रीय कार्यालयाकडून आढावा घेतला जात आहे. होर्डिंग व्यावसायिकांनी भेट घेऊन त्यांचे म्हणणे मांडले आहे.

- राजेंद्र भोसले, आयुक्त, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.