घोडेगाव : आंबेगाव व खेड तालुक्याच्या सीमा भागात अवैध दारू विक्री करणारा रोहिदास मुरलीधर तिटकारे याचेवर अवैद्य दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कारवाईसाठी गेलेल्या घोडेगाव पोलीसांना तुमची हद्द नाही, तुम्ही कारवाई करू शकत नाही अशी दमदाटी करून सरकारी कामात अडथळा आणल्याने त्याचेवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोडेगाव भीमाशंकर रस्त्यालगत खेड मध्ये तिटकारे हा दारू विक्री करत होता. खेड हद्दीमध्ये राहण्यास परंतु दारू विक्री आंबेगाव तालुक्यामध्ये करणा-या व्यक्तिंनी मागील अनेक दिवसांपासून हद्दीच्या कारणावरून या परिसरामध्ये धुमाकुळ घातला होता. संबंधित व्यक्ति पोलीस ठाणे व तालुका हद्दीवरून पोलीसांनाही जुमानत नव्हते. जंगलामध्ये विशिष्ट लोकांनाच दारू देत असल्यामुळे त्याच्यावर कारवाईसाठी अनेक वेळा प्रयत्न करूनही यश येत नव्हते.
मात्र गुरूवार (ता१७ ) रोजी सायं ७ वाजण्याच्या सुमारास रोहिदास मुरलीधर तिटकारे (वय - ३७ रा. दाबेवाडी, नायफड ता. खेड) याचेवर लक्ष ठेवून त्यांच्या घराच्या बाजूस उभी असलेली एम एच १० - ४३३७ या चारचाकी वाहनामध्ये देशी व मेकडॉल कंपनीच्या दारूच्या बाटल्या मिळाल्या. त्या जप्त करण्यात आल्या.
त्यावेळी तिटकारे यांने तुंम्ही येथे कशाला आले, ही तुमची हद्द नाही, आम्ही खेड हद्दीत दारू विक्री करतो, तुम्हाला येथे येण्याचा अधिकार नाही असे सांगत अंगावर धावून येत सरकारी कामात अडथळा आणल्याने पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतिश गुरव यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ब्रिदेव काबुगडे करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.