‘आयएमए’ देणार क्वारंटाइनच्या मार्गदर्शक सूचना

कोरोना झाल्यानंतर तुम्ही घरात ‘क्वारंटाइन’ आहात का? अशा वेळी तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी कोणती आणि कशी काळजी घ्यावी, असा प्रश्न तुम्हाला पडतोय ना?
Quarantine
Quarantinesakal
Updated on
Summary

कोरोना झाल्यानंतर तुम्ही घरात ‘क्वारंटाइन’ आहात का? अशा वेळी तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी कोणती आणि कशी काळजी घ्यावी, असा प्रश्न तुम्हाला पडतोय ना?

पुणे - कोरोना (Corona) झाल्यानंतर तुम्ही घरात ‘क्वारंटाइन’ (Quarantine) आहात का? अशा वेळी तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी कोणती आणि कशी काळजी (Care) घ्यावी, असा प्रश्न तुम्हाला पडतोय ना? तुमच्या मनातील या आणि अशाच प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) (IMA) महाराष्ट्र शाखेने कृती दल (टास्क फोर्स) स्थापन केले आहे.

कोरोनाच्या दोन्ही लाटा आपण अनुभवल्या आहेत. आता पुन्हा रुग्णांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर ‘आयएमए’च्या महाराष्ट्र शाखेने पुढाकार घेऊन कृती दल स्थापन केले आहे. कोरोनाची लक्षणे दिसल्यापासून रुग्णाचे योग्य पद्धतीने विलगीकरण खूप महत्त्वाचे ठरते. कारण, या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे संसर्गाचे प्रमाण जास्त आहे. अर्थात, त्यामुळे रुग्ण अत्यवस्थ होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. अशा परिस्थितीत रुग्णाचे योग्य प्रकारे विलगीकरण करणे आवश्यक असते.

Quarantine
पुणे शहरात कोरोना रुग्णांत ३० दिवसांत दहा पटीने वाढ

‘‘बाह्य रुग्ण विभागात आलेल्या रुग्णांना तपासणे किंवा रुग्णालयात दाखल रुग्णांवर उपचार करणे, इतका मर्यादित दृष्टिकोन एखाद्या साथरोग उद्रेकात डॉक्टरांचा नसावा. याचे व्यवस्थापन तज्ज्ञ डॉक्टरांच्या हातामध्ये पाहिजे,’’ असे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेचे सचिव डॉ. मंगेश पाटे यांनी स्पष्ट केले.

आरोग्यमंत्री, मुख्यमंत्री यांना निवेदन देणार आहे. राज्यातील नागरिकांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यासाठी राज्यभरातील डॉक्टरांचा सहभाग घेण्यात येत आहे.

- मंगेश पाटे, सचिव, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र शाखा

काय करणार?

  • कोणत्या रुग्णांना नेमकी कोणती किती

  • प्रमाणात औषधे द्यावी, याची माहिती कृतीदलाच्या माध्यमातून डॉक्टरांना दिली जाईल.

  • घरात विलगीकरणातील रुग्णांनी नेमके कधी काय करावे याची माहिती मिळणार

  • कुटुंबातील, सोसायटीतील नागरिकांनी स्वतःची कशी काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शन

दलातील सदस्य

डॉ. रमण गंगाखेडकर, डॉ. राहुल पंडित, डॉ. अर्चना पाटे, डॉ. अनिला मॅथिव्ह, डॉ. भाविन झंकारिया, डॉ. संजय मानकर, डॉ. भक्ती सारंगी, डॉ. अविनाथ फडके, डॉ. सुप्रिया अमेय, डॉ. अरुणा पुजारी, डॉ. संगीता चेक्कर, डॉ. शशांक जोशी, डॉ. हर्षद लिमये

कृती दलाचे अंतरंग

  • साथरोग तज्ज्ञ, प्रौढांमधील अतिदक्षता विभागातील तज्ज्ञ, औषधनिर्माण शास्त्र, लहान मुलांवरील उपचारतज्ज्ञ,

  • कोणती औषधे रुग्णाला कोणत्या टप्प्यावर किती प्रमाणात वापरावी, याची माहिती हे कृती दल देईल.

पहिल्या दोन लाटांत काय होते?

  • श्वसनसंस्थेशी संबंधित आजार जास्त होते

  • विषाणू फुफ्फुसांवर सर्वाधिक आक्रमण करत होता

  • खूप ताप, डोकेदुखी, प्रचंड खोकला, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे

तिसऱ्या लाटेच्या प्रारंभी काय दिसतंय?

  • फुफ्फुसावर आक्रमण करण्याचे प्रमाण कमी

  • सौम्य ताप, अशक्तपणा, सर्दी, घशात खवखवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.