सकाळी 'सकाळ'ला बातमी दुपारी परिणाम, पिंपरी-चिंचवडला दिवसाआड पाणी

Sakal-Impact
Sakal-Impact
Updated on

पिंपरी : पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाचा पाणीसाठा कमी झाल्याने शहरात आणखी पाणीकपात होणार अशी बातमी फक्त ई सकाळनेच गुरुवारी सकाळी दिली अन् दुपारी लगेच पालिका प्रशासनाने त्याची दखल घेतली. सोमवारपासून (ता. 6) दिवसाआड पाणी पुरविण्याचा निर्णय त्यांनी आता घेतला आहे.

पवनाची खालावलेली पाणीपातळी आणि दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची सुरु असलेली नासाडी याबाबत 'पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीकपात वाढणार, दिवसाआड पाणी' या मथळ्याखाली काल सकाळी ई सकाळने वृत्त व्हायरल केले होते. त्यात फक्त 25 जूनपर्यंत शहराला पुरेल एवढे पाणी धरणात शिल्लक राहिल्याने दिवसाआड पाणी द्यावे लागेल,अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. या बातमीची काही तासातच पालिका प्रशासनाने तातडीने दखल घेतली. बातमीत म्हटल्याप्रमाणेच त्यांनी दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय दुपारी जाहीर केला. त्यामुळे किमान जुलैपर्यंत आता धरणाचे पाणी पुरणार आहे. तोपर्यंत पावसाळ्यामुळे पवनाचा साठा वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पाणीकपात केली असली,तरी पिण्याच्या पाण्याच्या नासाडी व गैरवापराकडे प्रशासनाचे अद्याप दुर्लक्षच आहे. खरे म्हणजे त्याकडे पहिले लक्ष देण्याची गरज आहे. पाण्याच्या गळतीचे प्रमाण 25 टक्के आहे. ते प्राधान्याने रोखण्याची आवश्यकता आहे. बांधकामाला वापरले जाणारे पिण्याचे पाणी तातडीने बंद केले पाहिजे. या पाण्यावरच सुरु असलेल्या वॉशिंग सेंटरची कनेक्शन तोडायला हवीत.ही प्रतिबंधक उपाययोजना करण्याऐवजी थेट दिवसाआड पाणीकपातीची कारवाई केल्याबद्दल नाराजीचा सूरही ऐकायला मिळतो आहे. दुसरीकडे पुणे येथे पिंपरी-चिंचवडनंतर महिन्याभराने लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर आता आठवड्यातून एक दिवस पाणी बंद ठेवले जाणार आहे. तेथे दिवसाआड पाणी केलेले नाही.मग आमच्या बाबतीतच हा दुजाभाव का अशी विचारणा पिंपरी-चिंचवडकर आता करू लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.