वेदिका शिंदेच्या इंजेक्शनवरील आयात शुल्क माफ

Dr. Amol Kolhe
Dr. Amol Kolhesakal media
Updated on

कोरेगाव भीमा : स्पायनल मस्क्युलर ॲट्रॉफी टाइप १ हा दुर्मीळ आजार झालेल्या वेदिका सौरभ शिंदे या ११ महिन्यांच्या मुलीच्या उपचारासाठी परदेशातून आयात कराव्या लागणाऱ्या झोलगेन्स्मा इंजेक्शनवरील आयात शुल्क माफ करण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाने १६ कोटींच्या इंजेक्शनवरील आयात शुल्क माफ करण्याचे आदेश दिले आहेत.

Dr. Amol Kolhe
'मिशन पुणे': महापालिका निवडणुकीसाठी भाजपची मोर्चेबांधणी

लांडेवाडी, भोसरी येथील विकास कॉलनीत राहणाऱ्या सौरभ शिंदे यांची कन्या वेदिका हिच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्यावरील उपचारासाठी आवश्यक झोलगेन्स्मा इंजेक्शन अमेरिकेतून आयात करावे लागणार आहे. या इंजेक्शनची मूळ किंमत जवळपास १६ कोटी रुपये इतकी असून, आयात शुल्क व अन्य कर मिळून २२ कोटी रुपये इतका खर्च येणार होता. त्यानुसार सौरभ शिंदे यांनी मित्र परिवार व लोकवर्गणीद्वारे इंजेक्शनसाठी लागणारे १६ कोटी रुपये जमा केले आहेत. मात्र आयात शुल्क व अन्य करांपोटी भरावी लागणारे सहा कोटी रुपये माफ होणे आवश्यक होते. त्यानुसार शिंदे यांनी माजी आमदार विलास लांडे यांच्या माध्यमातून खासदार डॉ. कोल्हे यांची भेट घेऊन लक्ष घालण्याची विनंती केली होती.

Dr. Amol Kolhe
पुणे : कात्रज प्राणीसंग्राहलयातील प्राण्यांसाठी आफ्रिकेतून मागवणार औषधे

खासदार डॉ. कोल्हे यांनी लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वेदिका शिंदे व युवान रामटेककर या दोन्ही मुलांच्या आजाराचा उल्लेख करत अशा दुर्मीळ आजारावरील उपचारासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याची मागणी केली होती. तसेच केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन व अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून तसेच ट्विट करून विशेष बाब म्हणून करमाफीची मागणी केली होती. इतकेच नव्हे तर इंजेक्शनचे शेल्फलाईफ जेमतेम १५ दिवसांचे असल्याने आयात कर माफीचा निर्णय तातडीने होणे गरजेचे आहे, ही बाब लक्षात आणून देत सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेरीस बुधवारी (ता. ९) अर्थमंत्रालयाने विशेष बाब म्हणून झोलगेन्स्मा इंजेक्शनवरील आयात शुल्क माफ करण्याचे निर्देश जारी केले. त्यामुळे वेदिकाच्या उपचाराचा मार्ग मोकळा झाला आहे.

Dr. Amol Kolhe
नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पास जमीन देण्यास शेतकऱ्यांचा नकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.