Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त प्रमुख 17 रस्ते वाहतुकीस बंद

Pune major roads closed for Ganesh Visarjan procession: मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर प्रमुख रस्ते वाहतुकीस खुले करून देण्यात येणार आहेत. विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास होणार आहे.
Pune Traffic News
Pune Traffic News
Updated on

Pune News: गणेश विसर्जन मिरवणुकीनिमित्त पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. मध्यभागातील प्रमुख १७ रस्ते वाहतुकीस बंद राहणार आहेत. मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर प्रमुख रस्ते वाहतुकीस खुले करून देण्यात येणार आहेत. विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास होणार आहे.

मिरवणूक सुरू होण्यापूर्वी मध्यभागातील लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, केळकर रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता गणेश रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, भांडारकर रस्ता, पुणे-सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रस्ता, बगाडे रस्ता गुरू नानक या रस्त्यांवरील वाहतूक विसर्जन मिरवणुकीची सांगता होईपर्यंत बंद राहणार आहे.

Pune Traffic News
Gaja Marne Pune : गजा मारणे पुणे पोलिसांच्या रडारवर, ४ तासांच्या चौकशीनंतर दिला 'दम', नेमकं प्रकरण काय?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.