मुंबई: आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb thorat) यांच्यात एक महत्त्वाची बैठक होणार आहे. पुणे जिल्ह्यातील (Pune district) तीन गावांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे. संध्याकाळी ४.३० वाजता ही बैठक होईल.
मौजे कोंढरी, घटके,धानवली गावांचे काममस्वरूपी पुनर्वसन करण्याची मागणी करण्यात आली आहे. पुण्यातील या तिन्ही गावांना भूस्खलनाची भीती आहे. माळीण आणि तळीये सारख्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी राज्य सरकारकडून विशेष काळजी घेण्यात येत आहे. माळीण आणि यावर्षी तळीये गाव भूस्खलन आणि दरड कोसळल्यामुळे उद्धवस्त झालं होतं.
महाडमध्ये झालेल्या प्रलयकारी पावसामुळं तळीये गावात दरड कोसळून त्यात ८५ जणांचा मृत्यू झाला तर अखं गावचं या दुर्घटनेत उद्ध्वस्त झालं. त्यानंतर डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या गावांचे पूनर्वसन करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. पुण्यातील आंबेगाव येथील माळीण गावाप्रमाणेच तळीयेचं देखील लवकरात लवकर पूनर्वसन करण्याची मागणी होत होती.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.