Adar poonawala
Adar poonawalaSakal

रात्रीतून लस उत्पादन वाढ अशक्य; आदर पूनावाला

लस उत्पादन ही एक विशेष प्रक्रिया आहे. त्यामुळे एका रात्रीत लस उत्पादन वाढविता येत नाही, असे सीरम इंडिया इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांनी स्पष्ट केले.
Published on

पुणे - लस (Vaccine) उत्पादन ही एक विशेष प्रक्रिया आहे. त्यामुळे एका रात्रीत लस उत्पादन वाढविता येत नाही, असे सीरम इंडिया इन्स्टिट्यूटचे(Serum India Institute) सीईओ(CEO) आदर पूनावाला (Adar Poonawala) यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारकडून (Central Government) शास्त्रीय, नियमन आणि अर्थविषयक अशा सर्वच बाबतीत पाठिंबा मिळत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. सोमवारी जारी केलेल्या पत्रकात आदर यांनी कोव्हिशिल्ड लसीबाबत (Covishield vaccine) सध्या चर्चा सुरु असलेल्या विविध मुद्यांवर भाष्य केले. त्यांनी म्हटले आहे की, भारताची लोकसंख्या(Population of India) प्रचंड आहे. त्यामुळे सर्व प्रौढांसाठी(adults) लस निर्माण करणे हे काम सोपे नसल्याचा मुद्दा आपल्याला आवर्जून लक्षात घ्यावा लागेल. तुलनेने कमी लोकसंख्या(Population) असूनही अनेक प्रगत देश आणि कंपन्या(Advanced countries and companies) यासाठी झगडत आहेत.

Adar poonawala
Pune Corona Update : नव्या रुग्णसंख्येत घट; मात्र ६१ रुग्णांचा मृत्यू

केंद्र सरकारच्या साथीत कंपनीने गेल्या वर्षी एप्रिलपासून समन्वय राखला असून त्यानुसार काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येकाला शक्य तितक्या वेगाने लस उपलब्ध व्हावी असे वाटत असल्याची आपल्याला कल्पना असल्याचे सांगून ते म्हणाले की, आम्ही सुद्धा यासाठीच प्रयत्नशील आहोत. त्यासाठी शक्य असलेला प्रत्येक प्रकारचा प्रयत्न केला जात आहे. आम्ही आणखी कसून प्रयत्न करू आणि भारताचा कोरोनाविरोधी लढा भक्कम करू.

सीरमच्या आघाडीवर

  • डोसची आतापर्यंतची ऑर्डर - २६ कोटी

  • पुरवठा केलेले डोस - १५ कोटी

  • केंद्राकडून शंभर टक्के अनामत रक्कम - १७३२.५० कोटी

  • या रकमेचा तपशील - ११ कोटी डोसच्या ऑर्डरपोटी, जे पुढील काही महिन्यांत देणार

  • काही महिन्यांत राज्ये, खासगी रुग्णालयांना - ११ कोटी डोस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()