Ambegaon News : आंबेगाव तालुक्यातबिबट्या पाठोपाठ ड्रोनच्या घिरट्यांनी नागरिक भयभीत

बिबट्या पाठोपाठ ड्रोनचे संकट आले की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.
Ambegaon News
Ambegaon Newsesakal
Updated on

मंचर : आंबेगाव तालुक्यात सातगाव पठार, लांडेवाडी, अवसरी खुर्द, एकलहरे, शिंदेवाडी, गावडेवाडी या परिसरात गुरुवारी (ता.११) रात्री ड्रोन फिरत होते. गेली अनेक दिवस रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या ड्रोनविषयी पोलीस व प्रशासनाकडून कुठलाही खुलासा केला जात नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्या पाठोपाठ ड्रोनचे संकट आले की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.

Ambegaon News
Jalgaon News: वारकऱ्यांच्या मदतीला धावली मुक्ताईची लेक! रोहिणी खडसेंच्या प्रयत्नांना यश; रद्द बस अखेर पंढरपूरला रवाना

गेली वर्षभर बिबट्याच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या आंबेगाव तालुक्याच्या पूर्व, मध्य, दक्षिण व उत्तर भागात ड्रोन घिरट्या घालत आहेत. ड्रोनद्वारे रात्रीच्या वेळी टेहळणी करून चोरटे योग्य संधी साधून चोरी करत असल्याची चर्चा गावोगावी सुरु आहे. पण ड्रोन रात्रीच्या वेळीच का फिरतात? याबद्दल कोणत्याही यंत्रणेकडून ठोस अशी माहिती उपलब्ध होत नाही. मुंबई येथे सुरु असलेल्या विधानसभेतही आंबेगाव व शिरूरमध्ये रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या ड्रोन विषयी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.पण याबाबतही सरकारकडून अद्याप माहिती देण्यात आली नाही.

Ambegaon News
Jalgaon News: वारकऱ्यांच्या मदतीला धावली मुक्ताईची लेक! रोहिणी खडसेंच्या प्रयत्नांना यश; रद्द बस अखेर पंढरपूरला रवाना

सद्यस्थितीत निर्माण झालेल्या परस्थितीमुळे भंगार गोळा करणारे, फेरीवाले किंवा अन्य अनोळखी व्यक्ती गावात व वस्तीवर फिरताना आढळून आल्यास त्याची कसून चौकशी करण्याचे काम गावातील काही मान्यवरांकडून सुरु आहे.

Ambegaon News
Jalgaon Accident News: महामार्गावरील उभ्या ट्रकवर भरधाव टँकर आदळून दोन ठार! वरणगावजवळील घटना; गुन्हा दाखल

“नागरिकांनी आपल्या जवळील मौल्यवान वस्तू सुरक्षितपणे बँका व पतसंस्थेच्या लॉकरमध्ये ठेवण्यास सुरुवात केली आहे. तसेच प्रत्येक कुटुंबाने घराच्या सभोवती उजेडाची व्यवस्था केली आहे.कुटुंबातील सर्व सदस्य रात्री आठच्या आत घरात येतात.”

-संजय पवळे, सरपंच पेठ (ता.आंबेगाव)

आंबेगाव तालुक्यात रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या ड्रोन बाबत मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील, वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांची संयुक्त बैठक नुकतीच झाली आहे.पण ड्रोनबाबत समाधानकारक माहिती उपलब्ध झाली नाही. त्यामुळे आमच्यासह नागरिकांमध्ये संभ्रम अवस्था आहे.सद्यस्थितीत रात्री ड्रोन घिरट्या घालत असल्याचे पाहून नागरिक पोलीस पाटलांशी मोबाईलद्वारे संपर्क साधून विचारणा करतात. त्यामुळे पोलीस पाटलांनाही रात्र जागून काढावी लागते.

- गोरक्ष नवले पाटील, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र पोलीस पाटील संघटना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.