धनकवडी-सहकारनगर मध्ये 16 हजार 806 मुर्तींचे संकलन

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव टाळण्याकरिता गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला
धनकवडी-सहकारनगर मध्ये 16 हजार 806 मुर्तींचे  संकलन
Updated on

धनकवडी : गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव टाळण्याकरिता कात्रज,धनकवडी, बालाजीनगर ,आंबेगाव पठार भारती विद्यापीठपरिसरात यंदाचा गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा झाला. अत्यावश्यक दुकान व्यतिरिक्त इतर दुकाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते त्याचे तंतोतंत पालन करण्यात आल्याचे निदर्शनास आले.

मात्र काही दुकाने उघडी असल्याचे दिसताच पोलीस प्रशासनातर्फे तात्काळ बंद केली, परिणामी दुकाने बंद असल्याने रस्त्यावर रहदारी व गर्दी कमी असल्याचे दिसले.रविवार गणेश चतुर्दशी दिवशी गणेश बाप्पांच्या विसर्जनासाठी यावेळी प्रशासनाने सार्वजनिक हौद, नदी तलाव याठिकाणी बाप्पांच्या विसर्जनास बंदी घातली होती. त्यामुळे मूर्तींचे विसर्जन महापालिका प्रशासनाकडून फिरते विसर्जन हौद , स्थिर विसर्जन हौद यांची व्यवस्था संकलन केंद्रावर करण्यात आली होती.

यामुळे यावर्षी दहाव्या दिवशी अतिशय शांततेने ना ढोल-ताशांचा गजर, ना डॉल्बीचा दणदणाट, ना बँडपथक ना चित्ररथ, अशा स्थितीमध्ये शांततेत गणरायांचे दक्षिण पुणे शहरातील कात्रज-धनकवडी-बालाजीनगर सह उपनगरांमध्ये या परिसरातील भाविकांनी गणरायाला शांततापूर्वक निरोप दिला.

धनकवडी-सहकारनगर मध्ये 16 हजार 806 मुर्तींचे  संकलन
सहकारनगरमध्ये घरगुती गणपती बाप्पाचे उत्साहात विसर्जन

धनकवडी-सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या 31 संकलन केंद्रावर एकूण 16 हजार 806 मुर्त्यांचे संकलन आणि 21 हजार 547 मूर्तीचे विसर्जन झाले. तसेच 19 टन 910 किलो निर्माल्य जमा केले. अशी माहिती सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार यांनी सांगितले.

पालिकेच्या यंत्रणेसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी आणिसामाजिक संस्थेतर्फे फिरत्या व बांधीव हौदाची सोय केली होती. यामुळे नागरिकांना घराजवळ मुर्ती विसर्जन किंवा दान करणे सोयीचे झाले होते. फिरता हौद या उपक्रमास नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने गणेश विसर्जनची उत्तम व्यवस्था केली होती. त्यात क्षेत्रिय कार्यालयचे 31 संकलन केंद्र , क्षेत्रिय कार्यालयमार्फत 4 फिरते हौद, घनकचरा व्यवस्थापन विभागा मार्फत 4 फिरते हौद आणि खाजगी मालकीचे 4 फिरते हौद होते. 7860 किलो अमोनिया बाय कार्बोनेट पावडरचे मोफत घरगुती गणपती विसर्जनासाठी वाटप करण्यात आले होते. विसर्जना दिवशी सकाळ पासूनच ते रात्री 11 वाजे पर्यंत गणेश मूर्ती संकलित करण्यात आल्या.

क्षेत्रिय कार्यालयाच्या वतीने मुर्ती संकलन केंद्र व फिरत्या हौदाची सोय करण्यात आल्यामुळे नागरिकांना विसर्जन अधिक सोयीचे झाले होते.यासाठी नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. असे सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार यांनी सांगितले.

यावेळी दोन वरिष्ठ आरोग्य निरीक्षक अकरा आरोग्य निरीक्षक तसेच 235 सेवक दोन उपअभियंता चार कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.