पुण्यात विवाहितेची हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या

कौटुंबिक वाद असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज
पुण्यात विवाहितेची हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या
पुण्यात विवाहितेची हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्याsakal
Updated on

किरकटवाडी : सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक (ता. हवेली) येथील एका हॉटेलमध्ये 32 वर्षीय विवाहीतेने छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. 11 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास उघडकीस आली आहे. रंगोली भास्कर वडावराव ( रा. सर्व्हे नं. 51,धानोरी,पुणे.) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. कौटुंबिक वादातून सदर महिलेने आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज हवेली पोलीसांनी वर्तवला आहे.

दरम्यान हॉटेलमधील कर्मचाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सदर महिला दि.11 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास हॉटेलमध्ये आली व एक दिवस राहणार असल्याचे सांगितले. एकट्या व्यक्तीस रुम देण्यात येत नसल्याचे महिलेला सांगितले तेव्हा, माझ्या बरोबर जे राहणार आहेत त्यांना यायला थोडा वेळ लागणार आहे असे महिलेने सांगितले. तशी नोंद रजिस्टरमध्ये करून महिलेचे ओळखपत्र जमा करुन घेण्यात आले.

सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वेटरने ही महिला ज्या खोलीत होती तेथे काही हवे आहे का हे विचारण्यासाठी फोन लावला असता फोन उचलला नाही. त्यामुळे वेटरने दरवाजा वाजवला तरीही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. वेटरने ही बाब मॅनेजरला सांगितली असता शंका आल्याने मॅनेजरने हॉटेल मालकाला बोलावून घेतले. हॉटेल मालकाने तात्काळ हवेली पोलीस ठाण्याला याबाबत कळवले. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पोलीस आल्यानंतर दरवाजा तोडण्यात आला असता संबंधित महिला ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत हवेली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस हवालदार रामदास बाबर अधिक तपास करत आहेत.

दोन महिन्यांपूर्वीच झाले होते दुसरे लग्न

मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला पहिल्या पतीपासून विभक्त झाली होती. दोन महिन्यांपूर्वीच तिने दुसऱ्या व्यक्तीबरोबर लग्न केले होते. तिला पहिल्या पतीपासून एक सात वर्षांचा मुलगा आहे. सध्या ती माहेरी आई-वडीलांकडे राहत होती.

नातेवाईकांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल होणार

सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून महिलेचे आई-वडील व भाऊ याबाबत तक्रार दाखल करण्यासाठी येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे यांनी दिली आहे. कौटुंबिक वाद असल्याचा प्राथमिक अंदाज अंदाज असून गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याप्रमाणे पुढील तपास करण्यात येईल. नातेवाईकांशी संपर्क झाला असून ते तक्रार दाखल करण्यासाठी येणार असल्याची माहिती प्राथमिक तपास करणारे हवालदार रामदास बाबर यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.