Pune Crime News: पुण्यात रक्षकच झाले भक्षक! ‘आरपीएफ’ जवानाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार

लग्न करण्यासाठी छत्तीसगडहून पुणे रेल्वे स्थानकावर आलेल्या एका प्रेमी युगुलाला धमकावत, अल्पवयीन मुलीवर सतत पाच दिवस अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली.
Pune Crime News
Pune Crime NewsEsakal
Updated on

लग्न करण्यासाठी छत्तीसगडहून पुणे रेल्वे स्थानकावर आलेल्या एका प्रेमी युगुलाला धमकावत, अल्पवयीन मुलीवर सतत पाच दिवस अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी रेल्वे प्रोटेक्शन फोर्सचा (आरपीएफ) जवान आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल झाला. सध्या तो फरारी आहे. यासंदर्भात रेल्वे प्रशासनानेही चौकशीचा आदेश दिला आहे.

‘आरपीएफ’मध्ये पुणे रेल्वे स्थानकावर नियुक्तीस असलेला हवालदार अनिल पवार याच्यावर बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार कलमांन्वये लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. या घटनेबाबत तत्परतेने कारवाई न केल्याबद्दल निरीक्षक बी. एस. रघुवंशी यांना ‘आरपीएफ’ने निलंबित केले आहे. पवारचा साथीदार कमलेश तिवारी याला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे.

Pune Crime News
Pune Crime News: तंबाखू खायला दिली नाही म्हणून एकावर चाकूने पोटात सपासप वार; जीवघेण्या हल्ल्याने शहरात खळबळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित १७ वर्षांची मुलगी तिच्या प्रियकराबरोबर १२ सप्टेंबरला छत्तीसगडहून पुणे स्थानकावर आली. त्यांना पुण्यात लग्न करायचे होते. स्थानकावर पवार आणि त्याच्या साथीदारांनी दोघांना चौकशीसाठी ‘आरपीएफ’च्या ठाण्यात नेले. तेथून रेल्वे वसाहतीमध्ये सिद्धार्थ मल्टिपर्पज सोसायटी कार्यालयात नेण्यात आले. त्या ठिकाणी युवकाला दुसऱ्या खोलीत ठेवून युवतीवर पवार आणि तिवारी यांनी पाच दिवस अत्याचार केला.

पाच दिवसांनी प्रियकराकडून पवार आणि तिवारीने सहा हजार रुपये घेतले. त्यानंतर दोघांना सोडून दिले. या घटनेने भेदरलेले प्रेमी युगुल छत्तीसगडला गेले. तेथे मुलीने पालकांना हा प्रकार सांगितला. त्यांनी न्यायालयात तक्रार केली. न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. आता हा गुन्हा पुणे रेल्वे स्थानक पोलिसांकडे तपासासाठी आला आहे. गुन्हा दाखल होत असल्याचे समजताच पवार पळून गेला आहे. त्याचा शोध सुरू असल्याचे लोहमार्ग पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले.

Pune Crime News
Maratha Reservation: "शरद पवार म्हणाले होते आरक्षण देऊ शकत नाही"; सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

चौकशीसाठी समिती नियुक्त

रेल्वे प्रशासनानेदेखील याची गंभीर दखल घेत सहाय्यक सुरक्षा आयुक्त पी. बी. दास यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली असून, तेदेखील प्रकरणाचा तपास करत आहेत. सात दिवसांत दास यांना अहवाल देण्याचे आदेश विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी दिले आहे.

काही अनुत्तरीत प्रश्न

संबंधित मुलीला पाच दिवस डांबून ठेवले आहे, याची माहिती ‘आरपीएफ’च्या गुप्तचर यंत्रणेला कशी मिळाली नाही?

रेल्वे स्थानकावरील वरिष्ठ अधिकाऱ्याला ही घटना कशी समजली नाही?

निराधारांना आश्रय देण्यासाठीच्या सिद्धार्थ मल्टिपर्पज संस्थेच्या कार्यालयात कोणाचा वावर नव्हता का? तेथे कोणाला ठेवण्यात येते, याचे रेकॉर्ड नव्हते का?

Pune Crime News
Arif Mohammed Khan: राज्यपालांचा मनमानी कारभार! केरळ सरकारची सुप्रीम कोर्टात धाव, केले गंभीर आरोप

या घटनेची रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. पोलिस आणि रेल्वे प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या सर्व संबंधितांवर कडक कारवाई होईल.

- डॉ. रामदास भिसे, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

महिलांच्या सुरक्षिततेबाबतची ही गंभीर घटना आहे. ‘आरपीएफ’चा जवान साथीदारासह रेल्वे स्थानकावर काय उद्योग करत आहे, हे त्याच्या वरिष्ठांना समजत कसे नाही, संबंधित जवान पळून कसा जाऊ शकतो, त्याला पाठीशी कोण घालत आहे, याबाबत तातडीने कारवाई केव्हा होणार?

- हर्षा शहा, रेल्वे प्रवासी ग्रुप

Pune Crime News
Raghav Chadha:'इंडिया' आघाडीच्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा डाव, 'आप'नेते राघव चड्ढा यांचा आरोप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.