Talegaon News : तळेगावात दुमदुमला स्वामी समर्थ नामाचा जयघोष

तळेगाव येथे श्री स्वामी समर्थ जयंतीनिमित्त बुधवारी (ता.१०) इंद्रायणी काॅलनीमध्ये आयोजित पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या शेकडो स्वामीभक्तांच्या मुखातून निघालेल्या स्वामी नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.
Talegaon News
Talegaon Newssakal
Updated on

Talegaon News : तळेगाव स्टेशन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) आणि सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या संयुक्त विदयमाने श्री स्वामी समर्थ जयंतीनिमित्त बुधवारी (ता.१०) इंद्रायणी काॅलनीमध्ये आयोजित पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या शेकडो स्वामीभक्तांच्या मुखातून निघालेल्या स्वामी नामाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सारिका गणेश काकडे दांपत्याच्या हस्ते श्री स्वामी समर्थ मंत्रांचे होमहवन झाले. पाठोपाठ शेकडो महीलांनी स्वामी चरित्र पठण केले. इंद्रायणी कॉलनीमधील सप्तशृंगी माता मंदिरापासून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली.

पालखी पाठोपाठ विद्युत रोषणाईने सजवलेल्या रथामध्ये ब्रम्हा,विष्णु,महेशरुपी दत्तावतारांच्या वेशभूषा केलेली मुलांची पात्रे मुख्य आकर्षण ठरली. पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात दिंड्या-पताका,भगवे ध्वज हाती घेऊन स्वामीभक्त पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.

इंद्रायणी कॉलनी, आनंदनगर, मनोहरनगर, वनश्रीनगर,स्वामी समर्थ मंदिर,सेमको कॉलनी, मोहननगर दरम्यान पालखी मार्गावर नागरिकांनी ठिक-ठिकाणी सडा रांगोळी काढून पुष्पवर्षावाने पालखीचे स्वागत केले.

Talegaon News
Talegaon Station Crime : चाकूने भोकसून तळेगावात तरुणाचा खून

अनेक स्वामी भक्तांनी पालखीला खांदा दिला. मावळचे खासदार श्रीरंग बारणे, गणेश खांडगे, माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, संतोष खांडगे,रविद्र भेगडे, निखिल भगत, कल्पेश भगत,किरण काकडे, आशिष खांडगे,शेखर मु-हे, विकी लोखंडे यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिक, महिला आणि स्वामीभक्तांनी पालखी सोहळ्यात सहभागी होऊन आरतीला हजेरी लावली.

पालखी सोहळ्यानंतर रात्री नऊ वाजता आरती आणि महाप्रसाद वाटपाने स्वामी जयंती सोहळ्याची सांगता झाली.स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या सेवेक-यांसह सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सारिका काकडे यांच्या मार्गदर्शनखाली प्रतिष्ठानच्या सदस्यांनी सोहळ्याचे नियोजन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()