पुणे : संविधानाच्या निर्मितीचा प्रवास उलगडणाऱ्या ‘मेकिंग ऑफ द कॉन्स्टिट्यूटशन’ या ई-फोटो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. इंग्रजी व्यतिरिक्त अकरा भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या प्रदर्शनाचे केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, संसदीय कार्य आणि संस्कृती राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, केंद्रीय विदेश आणि संस्कृती राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी याचे उद्घाटन केले. यावेळी चित्रांजली@७५ या व्हर्च्युअल चित्रपट पोस्टर प्रदर्शनाचे उद्घाटनही पार पडले. (Pune News)
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने हे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ठाकूर म्हणाले, ‘‘संविधान निर्मितीची प्रक्रिया लोकांना समजावी म्हणून या ई-फोटो प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून देशातील युवकांना संविधान जाणून घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे. तसेच त्यांचे अधिकार आणि कर्तव्याची जाणीव करून देण्याचाही प्रयत्न आहे. लवकरच यासाठी ‘नो युवर कॉन्स्टिट्यूशन’ हे अभियान सुरू करण्यात येईल.’’
प्रदर्शनाची वैशिष्ट्ये...
-प्रदर्शनात २५ दुर्मीळ छायाचित्रे
-‘चित्रांजली’मध्ये ७५ प्रसिद्ध चित्रपटांचा समावेश
-सामाजिक जागृती आणि स्वातंत्र्यसैनिकांवर आधारित चित्रपट
-प्रदर्शनाचे संकेतस्थळ : https://www.nfai.gov.in/virtual-poster-exhibition.php
-ई-बुक : https://constitution-of-india.in
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.