Baramati News : आणि अजितदादांचे दिसले कॅरमकौशल्य...

रितसर फीत कापल्यानंतर येथे ठेवलेल्या कॅरम व सोंगटया बघून एक तरी सोंगटी मारु असा मोह अजितदादांना झाला
Inauguration of Shramana Recreation Centre Ajit pawar show his carrom skills
Inauguration of Shramana Recreation Centre Ajit pawar show his carrom skillssakal
Updated on

बारामती - एरवी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून इतर बाबींसाठी अजिबात वेळ न मिळणा-या अजित पवार यांनी आज बारामतीत श्रमण करमणूक केंद्राच्या उदघाटनाप्रसंगी कॅरममधील आपले कौशल्य दाखवून दिले.

Inauguration of Shramana Recreation Centre Ajit pawar show his carrom skills
Ajit Pawar: “अजितदादा ज्या मस्तीत वागत होते, त्याच्या 10 टक्केही मुख्यमंत्री वागत नाहीत”

कै. रघुनाथ गेनबा बोरावके ट्रस्ट संचलित ज्येष्ठ नागरिक निवासातील मेहता भोजन कक्ष व श्रमण करमणूक केंद्राच्या उदघाटनानिमित्त आज काही क्षण विरंगुळ्याचे अनुभवले. या करमणूक केंद्राच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी बुध्दीमळ, कॅरम अशा खेळांची सोय निर्माण करुन देण्यात आली होती. रितसर फीत कापल्यानंतर येथे ठेवलेल्या कॅरम व सोंगटया बघून एक तरी सोंगटी मारु असा मोह अजितदादांना झाला.

Inauguration of Shramana Recreation Centre Ajit pawar show his carrom skills
Ajit Pawar: “अजितदादा ज्या मस्तीत वागत होते, त्याच्या 10 टक्केही मुख्यमंत्री वागत नाहीत”

त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून समोरच्या खुर्चीवर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बसल्या होत्या. अजित पवारांनी स्वताः सोंगट्या लावल्या आणि नेम धरुन स्ट्रायकर मारला. त्यांच्या एका फटक्यात एक सोंगटी त्यांनी घालवली. त्यांच्या या कौशल्याने उपस्थित सर्वच अवाक झाले.

सर्वांनीच टाळ्या वाजवून त्यांच्या या कौशल्याचे स्वागत केले. ज्येष्ठ नागरिक निवासामध्ये आल्यानंतर अजित पवार यांचा मूड नेहमी वेगळाच असतो हे वारंवार दिसले, त्याचा प्रत्यय आजही आला. कार्यक्रमाला आज गर्दीमुळे उशीर झालेला असतानाही त्यांनी भरपूर वेळ देत सर्व ज्येष्ठांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.