Wagholi News : बिबटयाने वासराला ठार मारल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

घरासमोर पटांगणात म्हैस, वासरू व इतर जनावरे बांधली असताना दबा धरून बसलेल्या बिबटयाने वासरावर हल्ला करून त्याला जागीच ठार केल्याची घटना घडली.
Leopard Attack
Leopard Attacksakal
Updated on

वाघोली - कोलवडी (ता. हवेली) येथील भालसिंग वस्तीवर घरासमोर पटांगणात म्हैस, वासरू व इतर जनावरे बांधली असताना दबा धरून बसलेल्या बिबटयाने वासरावर हल्ला करून त्याला जागीच ठार केल्याची घटना मंगळवारी (दि. ८) मध्यरात्री घडली.

ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. बिबटयाने ठार केलेल्या वासराला नंतर शेतात नेले. मांजरी कोलवडी भागामध्ये बिबटयाच्या पाउलखुणा वारंवार दिसून येत होत्या. या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची सतत चर्चा होती. मांजरी परिसरात दोघा तिघांनी बिबट्याला कार मधून पाहिलेही होते.

मात्र मंगळवारी बिबट्याने वासराला ठार केल्याची घटनाच सी सी टीव्ही मध्ये कैद झाल्याने बिबट्याचां वावर या भागात असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे नागरिक भयभीत झाले आहे. वनविभागाने त्वरित याची दखल घेवून बंदोबस्त करावा. अशी मागणी नागरिक करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.