Income Tax Raid : दौंड शुगर मधील शोध मोहिम ८७ तासानंतर संपली

आलेगाव येथील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या खासगी साखर कारखान्यात प्राप्तीकर अधिनियम कलम १३२ अन्वये प्राप्तीकर विभागाने ७ ऑक्टोबर रोजी सकाळी शोध मोहिम सुरू केली होती
daund sugar mills
daund sugar millssakal media
Updated on

दौंड : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे सख्खे मामेभाऊ अध्यक्ष असलेल्या दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यातील प्राप्तीकर विभागाची शोध मोहिम ८७ तासानंतर संपली आहे. शोध मोहिमेत काही आक्षेपार्ह आढळले नसल्याचा दावा कारखान्याच्या वतीने करण्यात आला आहे.

daund sugar mills
जमीन घोटाळा प्रकरण: खडसेंच्या पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

आलेगाव (ता. दौंड) येथील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या खासगी साखर कारखान्यात प्राप्तीकर अधिनियम कलम १३२ अन्वये प्राप्तीकर विभागाने ७ ऑक्टोबर रोजी सकाळी शोध मोहिम सुरू केली होती. खबरदारीचा उपाय म्हणून मोहिमेंतर्गत केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ) चे सशस्त्र जवान तैनात करण्यात आले होते. अजित पवार यांचे मामेभाऊ जगदीश कदम (रा. देवळाली प्रवरा, जि. नगर) हे कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष आहेत तर लिंगाळी (ता. दौंड) येथील पुणे जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे संचालक आहेत. जगदीश कदम यांची प्राप्तीकर विभागाने पुणे येथे चौकशी केली. तर वीरधवल जगदाळे यांच्याकडे कारखान्याच्या प्रशासकीय इमारतीत कारखान्याचे व्यवहार व करविषयक चौकशी केली.

प्राप्तीकर विभागाकडून ४ दिवसात साखर, इथेनॅाल, आदींचा साठा आणि नोंदी तपासण्यात आल्या. त्याचबरोबर आर्थिक व्यवहरांशी संबंधित कागदपत्रे, अभिलेख व डिजिटल डाटाची पाहणी आणि पडताळणी करण्यात आली. शोध मोहिम सुरू असताना १० ऑक्टोबर रोजी सकाळी कारखान्याचा बॅायलर प्रदीपन सोहळा व तेराव्या गळित हंगामाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला होता. प्राप्तीकर विभागाचे अधिकारी १० ऑक्टोबर रोजी रात्री अकरा वाजता कारखान्यातील शोध मोहिम संपवून रवाना झाले.

daund sugar mills
देशांतर्गत विमानसेवा पूर्ण क्षमतेनं होणार सुरू; नवी नियमावली जाहीर

कारखान कोणाचा आहे यापेक्षा....

शोध मोहिमेविषयी वीरधवल जगदाळे म्हणाले की, `` कारखान्यात साठा तपासणी व नोंदींमध्ये किरकोळ विषय वगळता तफावत आढळलेली नाही. कारखान्याकडून आगाऊ व देय कर नियमितपणे भरला जातो. आमच्या दृष्टीने तपासणीत काही आक्षेपार्ह आढळलेले नाही. दौंड शुगर हा कारखाना कोणाचा आहे यापेक्षा तो शेतकरी आणि ऊस उत्पादकांचे हित जोपासत आहे, हे महत्वाचे आहे. २००९ पासून कोणताही भेदभाव न करता नोंदीप्रमाणे उसाचे गाळप करून ऊस उत्पादकांना आजपर्यंत सर्व पेमेंट अदा करण्यात आलेले आहे. ``

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.