इंदापूरात पाच वर्षांपासून रोज १५ गरिबांना अरुण राऊत देतात भोजन

आता पर्यंत ९०० गरिबांना घेतला लाभ
इंदापूरात पाच वर्षांपासून रोज १५ गरिबांना अरुण राऊत देतात भोजन
इंदापूरात पाच वर्षांपासून रोज १५ गरिबांना अरुण राऊत देतात भोजनsakal
Updated on

इंदापूर : भारतीय संस्कृतीत अन्नदान, औषधदान, ग्रंथदान, ज्ञानदान, प्राणदान यास अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्येक जण त्यास अनुसरून यथाशक्ती सेवा देत असतो. जन सेवा हीच ईश्वर सेवा केंद्रबिंदू मानून इंदापूर ( जि. पुणे ) येथील श्री नारायणदास रामदास हायस्कूल मधील सहशिक्षक अरुण राऊत, त्यांच्या पत्नी सौ. वैशाली, त्यांची मुलगी अपेक्षा, मुलगा वैभव हे गेल्या पाच वर्षांपासून दररोज संध्याकाळी इंदापूर एस. टी.स्टँड वर मुक्कामी किंवा पदपथावरील गरजू, गरीब, निराधार लोकांना स्वखर्चाने मोफत अन्नदान करत आहेत. राऊत कुटुंब दररोज संध्याकाळी किमान १५ लोकांना मोफत महाराष्ट्रीयन जेवण देत असून आता पर्यंत ९०० हुन जास्त गरजू व्यक्तींनी त्याचा लाभ घेतला आहे. त्यांचे सामाजिक कार्य आधार परिवाराच्या माध्यमातून चालत असून ते अनेक निराधारांचे आधारवड बनले आहेत.

दि. २९ नोव्हेंबर रोजी अरुण राऊत यांचा वाढदिवस असतो. वाढदिवशी वायफट खर्च न करता समाजातील गरीब व निराधार लोकांना भोजन देण्याचा त्यांनी संकल्प केला .त्यानुसार त्यांनी दि. २९ नोव्हेंबर २०१६ पासून हा उपक्रम निरंतर पणे सुरू केला. या उपक्रमामुळे राऊत कुटुंबास आत्मिक आनंद मिळू लागला. त्यामुळे रोजसंध्याकाळी त्यांची पत्नी व मुली जेवण बनवून देतात. ते व त्यांचा मुलगा दररोज सायंकाळी इंदापूर एस टी. स्टँड व पदपथावर बसलेल्या गरीब लोकांना जेवण देतात. त्यांच्या कार्याची दखल मानसी संजय कुलकर्णी, सुनील जोगळेकर, भगवान विठ्ठल दळवी, संजय चांदणे, नवनाथ एकाड, वर्षा माणिक भोंग ,विनया सतेश भोंग, डॉ.अमोल शेंडे,संदीप दोशी, अरुण सातव यांनी घेऊन यंदा त्यांना आर्थिक मदत केली आहे. त्यामुळे कोरोना महामारीत देखील त्यांचा हा उपक्रम सुरू आहे.सामाजिक कामाची आवड असल्यामुळे अन्नदाना बरोबरच श्री. राऊत हे सर्व जिव्हाळ्याच्या शक्ती एकत्र करून दरवर्षी आधार सेवा परिवाराच्या माध्यमातून तालुक्या तील काही विद्यालयातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करतात. अन्नदानाचे काम इथून पुढे आपल्या हातून मरेपर्यंत घडावे अशी त्यांची इच्छा असून या कार्यात मदत करणाऱ्या सर्वांच्या ते ऋणात राहू इच्छितात. त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()