इंदापूर - इंदापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या पुढील अडचणी वाढतच चालल्या असून त्यांच्या कुटुंबातून त्यांच्या विरोधात बंडाळी सुरू झाली आहे. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व पाटील यांचे चुलत बंधू मयूरसिंह पाटील यांनी अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांना पाठिंबा दिला आहे. यामुळे हर्षवर्धन पाटील यांना तिसरा धक्का बसला आहे.यामध्ये प्रथम भरत शहा, आप्पासाहेब जगदाळे आणि आता मयूरसिंह पाटील यांनी पाटील यांची साथ सोडल्याने शरदचंद्र पवार पक्षाला हा मोठा धक्का म्हणावा लागेल.