इंदापूर - इंदापूर विधानसभा निवडणूक 2024 साठीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीअंती 10 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले यामुळे इंदापूर विधानसभा निवडणूक रिंगणात 24 उमेदवार कायम राहिले असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून बंडखोरी केलेले प्रवीण माने यांची उमेदवारी कायम राहिल्याने इंदापूर विधानसभेसाठी विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील व पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने असा मुख्य तिरंगी सामना रंगणार आहे.