इंदापूर - विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत इंदापूर तालुक्यात ७६.९१ टक्के मतदानाची नोंद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. कल्याण पांढरे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जीवन बनसुडे यांनी दिली..दरम्यान, इंदापूर विधानसभेसाठी झालेली तिरंगी लढत तसेच मागील निवडणुकीपेक्षा वाढलेली टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार हे येणाऱ्या शनिवारी (ता. २३) कळणार असून, अतिशय अटीतटीच्या झालेल्या या मतदानात कोण बाजी मारणार, याकडे तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे..यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विद्यमान आमदार दत्तात्रेय भरणे यांनी, तर भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत हर्षवर्धन पाटील यांच्यासह परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून प्रवीण माने यांनीही जोरदार प्रचार यंत्रणा राबवत निवडणुकीत दुरंगीवरून सामना तिरंगीवर नेला..यामुळे इंदापूर विधानसभेसाठी झालेल्या या तिरंगी लढतीत प्रवीण माने यांच्या उमेदवारीचा कोणाला फायदा होणार, कोणाला तोटा होणार? त्याचवेळी दत्तात्रेय भरणे हे विजयाची हॅटट्रिक करणार की हर्षवर्धन पाटील दोनवेळच्या खंडानंतर पुन्हा विधानसभेत प्रवेश करणार, हे शनिवार मोजणीनंतर स्पष्ट होणार आहे..दरम्यान तालुक्यात झालेल्या अतिशय अटीतटीच्या मतदान प्रक्रियेत तिन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. तिघांकडूनही विजयाबाबत दावे प्रतिदावे करण्यात आले आहेत.यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याने आणि दुरंगीऐवजी तिरंगी सामना रंगल्याने कोण विजयी होणार याबाबत पारापारावर, चौकाचौकात जोरदार चर्चा सुरू आहे..मतदानातून कळणार राजकीय नेत्यांचे प्रस्थइंदापूर विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राजकीय नेत्यांनी मोठ्या प्रमाणावर पक्षबदल केले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणुकीसाठी इच्छुक असलेले प्रवीण माने यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवत जोरदार यंत्रणा राबवली..त्याचप्रमाणे इंदापूर शहरावर वर्चस्व असलेले भरत शहा यांनी प्रत्यक्ष भूमिका न घेता अंतर्गत यंत्रणा राबवली, तर अप्पासाहेब जगदाळे यांनी थेट भरणे यांना पाठिंबा दिला. निमगाव केतकीसह अन्य भागातील कार्यकर्त्यांनीही हर्षवर्धन पाटील यांना सोडचिठ्ठी देत भरणे किंवा मानेंना आपला पाठिंबा दिला. यामुळे अशा नेत्यांच्या गावांमध्ये कोणाला मताधिक्य मिळणार, यावर जोरदार चर्चा रंगत आहेत..इंदापूर विधानसभा मतदारसंघएकूण मतदार : ३,४१,४८५झालेले मतदान : २,६२,६३५इंदापूर तालुका एकूण टक्केवारी : ७६.९१२०१४ ला झालेले मतदान : ७८.७४२०१९ झालेले मतदान : ७६.३४२०१९ च्या तुलनेत इंदापूरमध्ये ०.५७ टक्के मतदान जास्त झाले#ElectionWithSakal.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.