वालचंदनगर : भवानीनगर (ता.इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने चालू २०२१-२२ च्या गळीत हंगामामध्ये कारखान्याच्या इतिहासातील सर्वाधिक विक्रमी उसाचे गाळप पूर्ण केले आहे. कारखान्याने १२९ दिवसामध्ये ९ लाख १९ हजार ९१३ मेट्रीक टन उस गाळपाचा टप्पा पूर्ण केला असून १० लाख मेट्रीक टन गाळपाकडे कारखान्याची वाटचाल सुरु आहे.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा चालू वर्षीचा गळीत हंगाम २४ ऑक्टोबर २०२१ सुरु झाला. १२९ दिवसामध्ये कारखान्याने ९ लाख १९ हजार ९१३ मेट्रीक टन उसाचे गाळप करून ९ लाख ८१ हजार ३०० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. मागील हंगामात कारखान्याने १५२ दिवसात ९ लाख १२ हजार ७१ मेट्रीक टन उच्चांकी गाळप झाले होते. चालू गळीत हंगामामध्ये गतवर्षीचा विक्रम कारखान्याने कमी दिवसामध्ये मोडला असून १० लाख मेट्रीक टन गाळपाकडे वाटचाल सुरु केली आहे.
तसेच कारखान्याचा सध्याचा सरासरी साखर उतारा १०.८८ टक्के आहे. सहवीज निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालू असून आज अखेर २ कोटी ८७ लाख २८ हजार युनिट वीज महावितरण कंपनीस निर्यात केली आहे. कारखान्याने ९ लाख मेट्रीक टन गाळपाचा टप्पा यशस्वी पार केल्याबद्दल कारखान्याचे सर्व सभासद, बिगर सभासद, ऊस तोडणी वाहतूक मुकादम, तोडणी मजूर, अधिकारी व कर्मचारी यांचे कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे ,उपाध्यक्ष अमोल पाटील व संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे. सध्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये अडीच लाख मेट्रीक टन उस शिल्लक असून १२ लाख मेट्रीक टन गाळपाचा उद्ष्ठि गाठण्यासाठी सभासद व बिगर सभासदांनी सहकार्य करण्याचे आवाहन काटे यांच्यासह संचालक मंडळाने केले आहे.
कार्यक्षेत्रातील सर्व उसाचे गाळप होणार
छत्रपती कारखाना नेहमीच सभासदांच्या उसाच्या गाळपाला प्राधान्य देत असतो. कारखान्याना अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी जास्तीजास्त उसाचे गाळप होणे गरजेचे आहे. कार्यक्षेत्रातील संपूर्ण शिल्लक ऊसाचे गाळप करण्यात येणार असून सभासदांनी ऊस गाळपाची चिंता करू नये तसेच सर्व ऊस आपल्या कारखान्याला द्यावा. सभासदांबरोबर बिगर सभासदांनी सहकार्य करण्याचे आवाहन अध्यक्ष प्रशांत काटे ,उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.