Indapur: धक्कादायक! दहावीत शिकणाऱ्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु

प्रथमेश विकास खबाले असं मयत विद्यार्थ्याचे नाव
Indapur: धक्कादायक! दहावीत शिकणाऱ्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु
Updated on

संतोष आटोळे

Indapur| येथील श्री. नारायणदास रामदास हायस्कूल मधील इयत्ता दहावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाळेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून प्रथमेश विकास खबाले (वय 16 वर्षे, रा.भाटनिमगाव,ता.इंदापूर) असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण इंदापूर तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रथमेश विकास खबाले हा श्री नारायणदास रामदास हायस्कूल येथे इयत्ता दहावी शिकणारा विद्यार्थी दुपारी शाळेत आल्यानंतर दररोजच्या प्रमाणे शाळेच्या प्रांगणात सामूहिक प्रार्थना झाल्यानंतर हा विद्यार्थी वर्गात गेला.त्यानंतर बाकावर बसल्यानंतर त्याला चक्कर आली.

Indapur: धक्कादायक! दहावीत शिकणाऱ्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु
Indapur Crime : हैवान कारकून! अतिप्रसंगाला विरोध केला म्हणून पाजलं कीटकनाशक; अल्पवयीन मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू

शिक्षकांनी त्यास इंदापूर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यानंतर इंदापूर उपजिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले..

Indapur: धक्कादायक! दहावीत शिकणाऱ्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु
Indapur Tahsildar Attack : इंदापूरच्या तहसीलदारांवर भररस्त्यात हल्ला; आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.